तुमच्या लोकप्रियतेवर नव्हे; तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार : मोहितेंनी कोल्हेंना सुनावले

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांची खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका
MLA Dilip Mohite
MLA Dilip MohiteSarkarnama

राजगुरुनगर (जि. पुणे) : तुम्ही स्वतःच्या लोकप्रियतेमुळे नव्हे; तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे खासदार झाला आहात, याचे भान असूद्या असा इशारा खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना दिला आहे. (NCP MLA Dilip Mohite criticizes MP Dr. Amol Kolhe)

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दूध संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आदींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी वाकी, संतोषनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार मोहिते बोलत होते.

MLA Dilip Mohite
रस्त्याच्या श्रेयवादातून आमदार बेनके-आशा बुचके आले आमनेसामने

आमदार मोहिते म्हणाले की, खेड तालुक्यातील निर्णय घेताना विचारात घेत नाही. तालुक्यात परस्पर येऊन कार्यक्रम करता आणि ज्यांनी निवडणूकीत जीवाचं रान करून निवडून आणले, त्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या विरोधकांना बरोबर घेता...हे काही बरं नाही. समाजकारण यू ट्यूब, फेसबुकवर पोस्ट टाकण्यएवढे सोपं नाही. ज्यासाठी तुम्हाला योग्य समजून मते दिली, त्या लोकांचे काम करा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत या! असा थेट पण बोचरा सल्लाही अमोल कोल्हे यांना आमदार मोहिते यांनी दिला.

MLA Dilip Mohite
गुलाबराव पाटील म्हणतात, ‘आता आमचं ठरलंय’

या वेळी जिल्हा बँकेचे मतदार प्रतिनिधी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, सुरेखाताई मोहिते,अरुण चांभारे,अनिलबाबा राक्षे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, अशोक राक्षे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, उपसभापती वैशाली गव्हाणे,पीएमआरडीए मंडळ संचालक वसंत भसे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, राजगुरूनगर बँकेचे उपाध्यक्ष अरुण थिगळे,नवनाथ होले,सुभाष होले आदी उपस्थित होते.

MLA Dilip Mohite
अजितदादा भाजपच्या रंजन तावरेंना काय प्रत्युत्तर देणार?

खासदार कोल्हे यांच्यावरील टीकेनंतर मोहिते यांनी आपला मोर्चा पुणे जिल्हा दूध संघाकडे वळविला. ते म्हणाले की, जिल्हा दूध संघाचा सध्याचा अध्यक्ष मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहे. संघातील डांबरट संचालक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्याने सत्ता उपभोगत आहेत. मात्र, पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन ते दूध उत्पादकांची लूट करीत आहेत. त्यांच्या विरोधात तक्रार केली, त्यात तथ्य आहे. मात्र, महाआघाडीचे तीन पक्षाचे सरकार असल्याने कारवाई होऊ शकत नसल्याची खंतही मोहिते यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com