Sameer Wankhede  Sarkarnama
देश

Sameer Wankhede News: समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ ? दिल्ली कोर्टात मानहानीचा दावा दाखल

NCB : 'एनसीबी'चे कायदेशीर सल्लागार जपन बाबू यांनी दिल्ली कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला

Ganesh Thombare

Delhi News: आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेले आणि 'एनसीबी'चे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. हा दावा 'एनसीबी'चे कायदेशीर सल्लागार जपन बाबू यांनी दिल्ली कोर्टात दाखल केला आहे. त्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

वानखेडे यांच्यावर आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवू नये, म्हणून तब्बल 25 कोटी रुपये उकळण्याचा कट रचला असल्याचा आणि त्यानंतर अभिनेत्याकडून 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. तसेच आर्यन खानला ज्यावेळी अटक करण्यात आली होती, तेव्हा वानखेडे हे बरोबर असल्याचे सिध्द करण्यासाठी ट्रान्सस्क्रीप्ट जोडण्यात आले होते.

त्या ट्रान्सस्क्रीप्टमध्ये 2 जून 2022 ला संभाषण झाले होते. तेथे जपन बाबू यांनी त्याला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानवर आरोपपत्राच्या मसुद्यात प्रस्तावित आरोपांबद्दल माहिती दिली होती, असा दावा करण्यात आला होता. मात्र, हे पूर्णपणे खोटे असल्याचे आता जपन बाबू यांनी म्हटले असून या विरोधात कोर्टात दावा दाखल केला आहे.

'एनसीबी'चे कायदेशीर सल्लागार जपन बाबू यांनी वानखेडेंच्या विरोधात 6 ऑक्टोबरला दिल्ली कोर्टात दाखल केली असून या तक्रारीत सांगितले की,"वानखेडेंनी त्यांच्याबाबत केलेले दावे पूर्णपणे खोटे आहेत.

वानखेडेंबरोबर असे कोणतेही संभाषण झाले नव्हते. तसेच वानखेडेंचे आरोप हे निराधार आहेत. वानखेडे यांनी दावा केल्याप्रमाणे अशा प्रकारे कोणतेही संभाषण झालेले नाही", असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आता समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Edited by : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT