चेतन व्यास
Wardha Political News : आर्वी येथील एमआयडीसीच्या श्रेयवादावरून आमदार दादाराव केचे यांनी संताप व्यक्त केला आहे. केवळ लोकांना बोलावून हार घालणे, गाड्या पाठवणे, लोक जमा करने हा छंद योग्य नाही. आपण याचा धिक्कार करतो, असे आमदार दादाराव केचे यांनी नमूद केले. मतदारसंघात कोणी कितीही लुडबूड केली तरी पक्षाचे पुढचे तिकीट आपल्यालाच मिळणार यात काही शंका नाही, असे आमदार केचे म्हणाले.
आमदार केचे यांनी उपमुख्यमंत्री यांचे पीए सुमित वानखेडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे औद्योगिक वसाहत मंजूर झाल्याची बातमी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी समोर आली. ही माहिती समोर येताच आर्वी विधानसभा क्षेत्रात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमित वानखेडे यांनी औद्योगिक वसाहत मंजूर झाल्याची माहिती समाजमाध्यमांवर टाकली आणि आर्वी विधानसभा मतदारसंघात श्रेयवादाला सुरुवात झाली. वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सुमित वानखेडे यांच्याकडे आहे. भाजप आमदार दादाराव केचे यांनी आपण औद्योगिक वसाहतकरिता पूर्वीपासून प्रयत्न करत असून, मंत्रिमंडळाच्या उच्चाधिकारी समितीच्या १५३ व्या बैठकीत मंजूर झाल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिवेशनात प्रश्नोत्तरात सांगितले असल्याचा दावा केला.
औद्योगिक वसाहत मंजूर केल्याचे आपण स्वागत करतो. कोणी काहीही पात्रता नसताना, मतदारसंघाचा संबंध नसताना, विधानसभा सभागृहाचा संबंध नसतानाही हे काम आपणच केले, असा आव आणत असेल तर यात काही अर्थ नाही. याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा आमदार केचे यांनी नाव न घेता सुमित वानखेडे यांना दिला.
केवळ लोकांना बोलावून हार घालणे, गाड्या पाठवणे लोक जमा करने हा छंद योग्य नाही, याचा धिक्कार करतो. मतदारसंघात कोणी कितीही लुडबूड केली तरी पक्षाचे पुढचे तिकीट आपल्याला मिळणार यात काही शंका नाही, असा दावा आमदार केचे यांनी केला.
आमदार केचे यांनी उपमुख्यमंत्री यांचे पीए सुमित वानखेडे यांच्यावर नाव न घेता या वेळी टीका केली. मतदारसंघात सध्या जे सुरू आहे, ते पाहता कोणीही असे वर्तन करू नये. आमदाराला आमदाराचं काम योग्यरित्या करू द्यावे. माझ्याविरुद्ध कोणी किती प्रयत्न केले तरी माझी जनता माझ्या सोबत आहे. उपमुख्यमंत्री यांना औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी म्हणून विनंती केली होती. त्यांनी शब्द दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी मंजूर केले, असंही केचे म्हणाले.
औद्योगिक वसाहतीचं श्रेय आमदार म्हणून माझं आहे. अधिवेशनात प्रश्न मी टाकला आणि मार्गीही मीच लावला. हा माझा अधिकार आहे. जे काम इतिहासात झाले नाही, ते काम मी करून दाखविले आहे. हे काम मी करतो असं या संभ्रमात कोणीही राहू नये, कारण दादाराव केचेत ही ताकद आहे, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.