Sansad Sarkarnama
देश

Sansad Bhavan : संसद भवनाजवळ एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले, नेमकं काय आहे कारण ?

Sansad Bhavan News: एका व्यक्तीने संसदेजवळ स्वतःला पेटवून घेतले. अज्ञात व्यक्ती गंभीर भाजली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sudesh Mitkar

Delhi News : देशाची राजधानी दिल्लीत एक खळबळजनक घटना  समोर आला आहे. येथे बुधवारी (25 डिसेंबर) एका व्यक्तीने संसदेजवळ स्वतःला पेटवून घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्ती गंभीर भाजली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, पेटून घेणाऱ्या व्यक्तीचा तपशील  अद्याप कळू शकलेला नाही. त्या व्यक्तीला आरएमएल रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हे पाऊल कोणत्या परिस्थितीत उचलले गेले याचा शोध घेत आहेत. सध्या या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून, संसद भवन परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

पोलिसांना घटनास्थळी पेट्रोल ही सापडले. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला.  माहितीनुसार घटनास्थळावरून अर्धी जळालेली 2 पानांची चिठ्ठी सापडली आहे, जी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे, 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने रेल्वे भवन जवळील उद्यानात स्वतःला पेटवून घेतले. यानंतर त्यांनी संसद भवनाकडे धाव घेतली. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे भवनाबाहेर स्वत:ला पेटवून देणाऱ्या व्यक्तीचे नाव जितेंद्र असे आहे. जितेंद्रचे वय अंदाजे 28 असून तो उत्तर प्रदेशातील बागपतचा रहिवासी आहे. बागपतचाच काही मुद्दा होता, ज्याबद्दल तो  चिंतेत होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT