Shrirang Barane : शिंदेंच्या खासदाराचे थेट फडणवीसांच्या गृह खात्यावर गंभीर आरोप

Shrirang Barane On Devendra Fadnavis : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांची भेट घेत खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली पोलिसांची झाडाझडती, केले गंभीर आरोप
Shrirang Barane
Shrirang Baranesarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्ववभूमीवर विरोधकांकडून सातत्याने गृहमंत्रालयाचा पदभार असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहेत. तसेच नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याच्या आरोप देखील विरोधकांकडून केला जत आहे. 

आता विरोधकांन बरोबर सत्तेत सहभागी असलेल्या मित्र पक्षांकडून देखील पोलीस प्रशासनाच्या गलधान कारभार वरून फडणवीसांच्या गृह खात्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.   

उद्योगनगरी, म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिस दलाची विभागणी करून स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा होईल हि अपेक्षा होती. तरी देखील तक्रारींची  तत्काळ दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून लोकप्रतिनिधींकडे करण्यात येत आहेत.  या पार्श्ववभूमीवर मावळचे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांची भेट घेत पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबत चर्चा केली. 

Shrirang Barane
New Governor Manipur : मागणी मुख्यमंत्री बदलाची, दिले नवे राज्यपाल; मणिपूरची जबाबदारी निवृत्त गृह सचिवांवर

याबाबत बारणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जात नाही. तक्रारदाराला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते म्हणूनच सर्व तक्रारी तत्काळ आणि योग्य प्रकारे हाताळल्या जाव्यात.

Shrirang Barane
Crime News : 20 रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी गेली अन् तिची हत्या झाली,असा सापडाला आरोपी

तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत. जनतेचा सरकारवरील विश्वास कायम ठेवणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे, हे प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य आहे, अशा सूचना त्यांनी पोलीस आयुक्तांना केल्या. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com