Congress Meeting Sarkarnama
देश

Congress Meeting: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत काँग्रेस नेत्यांची दिल्लीत चार तास खलबतं; हायकमांडने दिला 'हा' सल्ला

सरकारनामा ब्यूरो

Political News: राज्याच्या राजकारणात सध्या दररोज अनेक घडामोडी घडत आहेत. यातच आता महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील काँग्रेसच्या तबब्ल 25 नेत्यांची उपस्थिती होती. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह दिल्लीतील काँग्रेसचे दिग्गज नेतेही उपस्थित होते.

या बैठकीत महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीच्या संदर्भाने रणनीतीवर चर्चा झाली. महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींबाबत तब्बल चार तास काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खलबतं झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता आगामी निवडणुका महाराष्ट्रात काँग्रेस कशा पद्धतीने जिंकू शकते, यासंदर्भाने हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला दिला असल्याचं बोललं जात आहे.

याबाबतची माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, "आगामी लोकसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रात कशा पद्धतीने सामोरं जायचं? या संदर्भाने चर्चा झाली. तसेच हायकमांडने महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कामाचा आढावा घेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही महत्वाची चर्चा झाली", अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

याबरोबरच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे निर्देशच हायकमांडने दिले असल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलं. दिल्लीतील पक्षाच्या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, वर्षा गायकवाड, भाई जगताप यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT