Supreme Court on ED : सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका; ईडी संचालकांच्या कार्यकाळात घट...

Supreme Court : 2018 मध्ये दोन वर्षांच्या नियुक्तीनंतर संजय मिश्रा यांना 2021 मध्ये एक वर्षाची मुदतवाढ मिळाली
Supreme Court on ED :
Supreme Court on ED : Sarkarnama
Published on
Updated on

Supreme Court On ED Director Sanjay Mishra : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. सक्तवसुली संचलनालयाचे (ED) संचालक संजय मिश्रा यांच्या सेवेच्या कार्यकाळ कमी केला आहे. यापुढे ३१ जुलै २०२३ पर्यंतच मिश्रा यांचा कार्यकाळ असेल, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

सरकारने केलेल्या नियुक्तीनुसार, संजय मिश्रा १८ नोव्हेंबर २०१८ रोजी निवृत्त होणार होते. पण केंद्र सरकारने त्यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवला होता.पण आता नवीन संचालक नेमण्यासाठी तुमच्याकडे ३१ जुलैपर्यंत पुरेसा वेळ आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने मिश्रा यांचा कार्यकाळ कमी केला आहे.

Supreme Court on ED :
Devendra Fadnavis 'Chai Pe Charcha' : सुर्र के पियो... टपरीवरचा वाफाळलेला चहा आणि फडणवीसांची मित्रांसोबत गप्पांची रंगलेली मैफल !

सरकारकडून ईडीच्या संचालकांची मुदत वाढविण्याच्या मुद्द्यावरुनही केंद्राला फटकारले आहे. सरकारला कायदे करण्याचा अधिकार आहे परंतु ही मुदतवाढ बेकायदेशीर आहे आणि सध्याचे संचालक केवळ 31 जुलैपर्यंत ईडीमध्ये कार्यरत राहतील. 18 नोव्हेंबर 2018 रोजी केंद्र सरकारने संजय मिश्रा यांना पहिल्यांदा ईडीचे संचालक बनवले होते.

यानंतर सरकारने त्यांचा कार्यकाळ मध्यंतरी एक वर्षासाठी वाढवला.मिश्रा यांच्या सलग तिसऱ्यांदा नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने गेल्या वर्षी १२ डिसेंबर रोजी सरकारचे उत्तर मागवले होते. यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना ८ मे रोजी निर्णय राखून ठेवला होता.

Supreme Court on ED :
Raju Shetti's Son: राजू शेट्टींच्या चिरंजीवाच्या लग्नाची राज्यात चर्चा; पाहा खास फोटो!

खरं तर, 2018 मध्ये दोन वर्षांच्या नियुक्तीनंतर संजय मिश्रा यांना 2021 मध्ये एक वर्षाची मुदतवाढ मिळाली, तेव्हाच हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. त्यावेळी कॉमन कॉज नावाच्या एनजीओने सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर न्यायालयाने मिश्रा यांना दिलेली मुदतवाढ कायम ठेवली.मात्र मिश्रा यांना यापुढे मुदतवाढ मिळू नये, असे स्पष्टपणे सांगितले होते.

अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर मात करण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला.हा अध्यादेश केंद्रीय दक्षता आयोग कायद्यातील बदलांसाठी होता. ज्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआयच्या संचालकांना ५ वर्षांपर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते, अशी तरतूद होती. या अध्यादेशाच्या मदतीने सरकारने मिश्रा यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवला होता.

Supreme Court on ED :
Cabinet Expansion News : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर? कारण आले समोर!

कोण आहेत संजय मिश्रा?

संजय मिश्रा बद्दल जाणून घेऊया. संजय मिश्रा हे 1984 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी (IRS) आहेत. ऑक्टोबर 2018 मध्ये, संजय मिश्रा यांना ईडीचे माजी संचालक बनवण्यापूर्वी त्यांना तीन महिन्यांसाठी अंतरिम संचालक बनवण्यात आले होते. मिश्रा यांना आर्थिक तज्ञ देखील म्हटले जाते.त्यांनी आयकराच्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच त्यांची ईडी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ईडीचे प्रमुख बनण्यापूर्वी मिश्रा यांची दिल्लीतील आयकर विभागात मुख्य आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com