Tamil Nadu News : डीएमकेचे नेते ए. राजा (A Raja Controversy) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. या वेळी त्यांनी भारत माता आणि सनातन धर्माविषयी केलेल्या विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे. रामायण आणि भगवान श्रीरामांवर आपला विश्वास नाही. भारत माता कधीही स्वीकारणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे. यानंतर भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले.
पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi) दोन दिवसांपासून दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. अशावेळी राजा यांनी केलेल्या या विधानामुळे त्यांनी पुन्हा तमिळ राग आळवल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या (Congress) कर्नाटकातील खासदारानेही काही दिवसांपूर्वी दक्षिण भारत स्वतंत्र देश करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यावरूनही राजकारण तापले होते. कालच सुप्रीम कोर्टात तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांना फटकारले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर डीएमके नेत्यांकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत.
ए. राजा यांनी म्हटले आहे की, तुम्ही जर म्हणालात की हे तुमचे भगवान आहेत आणि भारत माता की जय, तर आम्ही हे भगवान आणि भारत माता कधीच स्वीकारणार नाही. त्यांना सांगा की आम्ही सगळे रामाचे शत्रू आहोत. मला रामायण आणि भगवान रामावर विश्वास नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारताविषयी (Bharat) बोलताना राजा म्हणाले, भारत हे कधीच एक राष्ट्र नव्हते. एका राष्ट्राचा अर्थ म्हणजे एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती. त्यानंतर ते एक राष्ट्र होते. भारत एक राष्ट्र नाही तर एक उपमहाद्वीप आहे. कारण इथे तमिळ एक राष्ट्र आणि एक देश आहे. मल्याळम एक भाषा, एक राष्ट्र आणि एक देश आहे. ही सगळी राष्ट्र मिळून भारत बनतो. त्यामुळे भारत हा देश नाही.
अनेकतामध्ये एकता असून आपल्यामध्ये मतभेद आहेत. त्याचा स्वीकार करायला हवा, असे सांगताना राजा म्हणाले, तमिळनाडू, केरळ, दिल्ली, ओडिशा अशा प्रत्येक राज्यात वेगळी संस्कृती आहे. काश्मीरची संस्कृतीही वेगळी आहे. मणिपूरमध्ये लोक श्वानाचे मांस खातात. एखादा समाज गोमांस खात असेल तर तुम्हाला काय अडचण आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.