JP Nadda Resign : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डांचा राज्यसभा सदस्यपदाचा राजीनामा, पण...

JP Nadda Latest News : जे.पी नड्डांसह 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे.
JP Nadda
JP Naddasarkarnama
Published on
Updated on

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा ( जे.पी ) यांनी हिमाचल प्रदेश मधून राज्यसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला ( Jp Nadda Resign ) आहे. अलीकडेच जे.पी नड्डा हे गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे जे.पी नड्डा आता गुजरातमधून खासदार असणार आहेत. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी जे.पी नड्डा यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

JP Nadda
Congress News : राम मंदिराचे निमंत्रण नाकारणं काँग्रेसला पडतंय महागात; दोन बड्या नेत्यांचा रामराम

याबाबत राज्यसभेनं एक पत्रक काढलं आहे. त्यात लिहिण्यात आलं, "हिमाचल प्रदेश राज्याचं प्रतिनिधीत्व करणारे जगत प्रकाश नड्डा यांनी राज्यसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. तो राजीनामा 4 मार्चला राज्यसभा सभापती यांनी स्वीकाराला आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जे.पी नड्डांसह 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यानंतर ते गुजरात राज्यातून राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतील. गुजरातमधून भाजपचे चार खासदार राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यात जे.पी नड्डा, जसवन्तसिंह परमार, मयंक नायक आणि गोविंदभाई ढोलकिया यांचा समावेश आहे.

JP Nadda
PM Narendra Modi News : काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींचा ‘बिग ब्रदर’ असा उल्लेख; नेमकं काय घडलं?

जे.पी नड्डा यांच्या राजीनाम्यानंतर हिमाचल प्रदेशमधील राज्यसभेची जागा रिकामी झाली आहे. आता झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे हर्ष महाजन जिंकले होते. काँग्रेसच्या 6 आमदारांनी हर्ष महाजन यांना मत दिल्यानं त्यांचा विजय झाला होता. तर, अभिषेक मनु सिंघवी यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. त्यानंतर काँग्रेसच्या 6 आमदारांना अपात्र घोषित करण्यात आलं होतं.

JP Nadda
Modi Ka Parivar : भाजप नेत्यांच्या बायोमध्ये अचानक 'मोदी का परिवार' !

दरम्यान, जे.पी नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ जून महिन्यापर्यंत वाढवला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच भाजप जे.पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढणार आहे.

JP Nadda
Lok Sabha Election 2024 : हायकोर्टाचे न्यायाधीश राजीनामा देऊन येणार राजकारणात; भाजपमध्ये करणार प्रवेश?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com