Jammu and Kashmir Assembly Sarkarnama
देश

Jammu and Kashmir Assembly : जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रचंड राडा; आमदारांमध्ये धक्काबुक्की, दोघे जखमी VIDEO

Article 370 Khurshid Ahmed Sheikh : आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी सभागृहात कलम 370 चा फलक दाखवल्यानंतर वादाला सुरूवात झाली.

Rajanand More

Srinagar : जम्मू आणि काश्मीर विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार राडा झाला. कलम 370 वरून सत्ताधारी आणि भाजपमधील आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. यामध्ये भाजपचे दोन आमदार जखमी झाल्याचे समजते. सुरक्षारक्षकांनी गोंधळ घालणाऱ्या आमदारांना बाहेर काढल्यानंतर वातावरण शांत झाले.

बारामूला लोकसभा मतदारसंघाचे खासदार इंजिनिअर रशीद यांचे बंधू आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी गुरूवारी सकाळी सभागृहात कलम 370 बाबतचा फलक झळकावला. राज्यात पुन्हा हे कलम लागू करण्याचा ठराव कालच सभागृहात पारित करण्यात आला आहे. शेख यांनी आज पुन्हा याबाबत फलक झळकवल्याने विरोधी बाकांवरील भाजपचे आमदार चांगलेच भडकले.

विरोध पक्षनेते सुनील शर्मा यांनी शेख यांच्या कृतीचा विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूचे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले. आमदारांमध्ये धक्काबुक्की सुरू झाल्यानंतर सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत काही आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. या गोंधळात भाजपचे दोन आमदार जखमी झाले आहेत.

खुर्शीद अहमद शेख हे लंगेट विधानसभा मतदारसंघातून अवामी इत्तेहात पक्षाचे आमदार आमदार आहेत. पीपल्स डेमोकर्टिक पक्षानेही कलम 370 आणि 35 ए पुन्हा लागू करण्याची मागणीसाठी विधानसभेत प्रस्ताव सादर केला होता.

दरम्यान, राज्याच्या विधानसभेचे अधिवेशन सहा वर्षांनी होत आहे. पाच दिवसांच्या या अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारने पाच ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवून राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला आहे. यापार्श्वभूमीवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले आहे.

आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही कलम 370 वरून केंद्र सरकारवर टीका केली होती. तसेच बुधवारी विधानसभेत याबाबतचा ठरावही पारित करण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभेत या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधात आमनेसामने उभे ठाकले आहेत.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT