Justin Trudeau Sarkarnama
देश

Canada Parliament News: रशियाविरुद्ध युद्ध लढलेल्या सैनिकाची आधी माफी; मग सन्मान, काय घडले कॅनडाच्या संसदेत?

Canada News : "सर्व कॅनडियन नागरिकांसाठी युरोसलवा हुंका यांचा सन्मान खूप महत्त्वाचा आहे."

Chetan Zadpe

Canada Political News: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो व कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष रोटा यांनी दुसऱ्या महायुद्धात लढलेले आणि कॅनडियन व युक्रेनच्या सैनिकांच्या कामगिरीचे कौतुक केले. त्यासोबतच या महायुद्धात रशियाविरुद्ध प्राणपणाने लढलेले युरोसलवा हुंका यांना ९८ व्या वर्षी पाठिंबा देत त्यांचा सन्मान करण्यात आला. हुंका यांची प्रथमत: माफी मागतो, असे म्हणत युरोसलवा हुंका यांचा कॅनडाच्या संसदेत सन्मान करण्यात आला. (Latest Marathi News)

कॅनडाच्या संसदेत आज असे काही घडलं की, पंतप्रधान व संसदेच्या अध्यक्षांना या संपूर्ण प्रकरणावरून देशाची माफी मागावी लागली आहे. दुसऱ्या महायुद्धात लढलेले कॅनडियन व युक्रेनच्या सैनिक आहेत. ते स्वातंत्र्यासाठी रशिया विरोधात लढले होते. आजही त्यापैकी जिवंत असलेले ९८ व्या वर्षीय युरोसलवा हुंका यांचा संसदेत सन्मान करण्यात आला.

या वेळी त्यांच्या सन्मानापूर्वी अध्यक्ष रोटा यांना माफी मागावी लागली. ते म्हणाले, "या सभागृहाची मान शरमेने झुकेल असे काही मला करायचं नव्हते. मात्र, मी मनापासून या सभागृहाची व इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाची आणि सर्व कॅनडियन नागरिकांची माफी मागतो, असे राष्ट्रअध्यक्ष रोटा म्हणाले.

दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही हा घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागितली. कॅनडाच्या संसदेसाठी तसेच सर्व कॅनडियन नागरिकांसाठी युरोसलवा हुंका यांचा सन्मान खूप महत्त्वाचा आहे, असे ट्रुडाे म्हणाले. दरम्यान, या घडलेल्या प्रकाराबद्दल अध्यक्ष रोटा यांनी दोन वेळा माफी मागितली आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याची मागणी कॅनडामध्ये जोर धरत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT