Mumbai News : सुमार कामगिरी असलेल्या विद्यमान भाजपच्या खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे. यामुळे आता भाजपच्या विद्यमान खासदारांना धडकी भरली आहे. सुमार खासदारांच्या जागी आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत भाजपकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. काही खासदारांच्या कामगिरीवर भाजप पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच महाराष्ट्र अन् मुंबईचा दौरा केला आहे. या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला होता. मुंबईतील लोकसभेच्या जागांवरसुद्धा बदल करण्याची चर्चा या वेळी करण्यात आली, अशी माहिती आहे. यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट होऊ शकतो.
लोकसभेसाठी भाजपने मिशन '४५ प्लस' लक्ष्य ठेवले आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी भाजपने सर्व आमदारांकडे विशेष जबाबदारी दिली आहे. गणेशोत्सवानंतर फक्त लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतदारसंघ बांधण्याचे आदेश सर्व आमदारांना दिले गेले आहेत.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.