vijay darda News Sarkarnama
देश

Coal Mining Allocation Fraud : माजी खासदार विजय दर्डांना धक्का; कोळसा खाणवाटप गैरव्यवहारात 6 जण दोषी : 18 जुलैला सुनावणार शिक्षा

सरकारनामा ब्यूरो

New Delhi News : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणांमध्ये विशेष न्यायालयाने काँग्रेसचे (COngress) माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांच्यासह सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. या आरोपींच्या शिक्षेवर 18 जुलैला सुनावणी होणार आहे.

कोळसा खाण प्रकरणात न्यायालयाने (Court) माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एचसी गुप्ता, केएस क्रोफा, के. सी. सामरिया या दोन अधिकाऱ्यांसह जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड व तिचे संचालक मनोज कुमार जयस्वाल या सगळ्यांना न्यायालयाने दोषी ठरवले.

आयपीसी कलम 120 बी, 420 व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली न्यायालयाने या सर्वांना दोषी ठरवले आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) फतेपुर खाणीचे कंत्राट जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्धतीने मिळवल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.

सीबीआयने (CBI) 27 मार्च 2013 रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात या सर्वजणांनी गैरमार्गाने कोळसा खान आपल्या ताब्यात घेतल्याचा, असा आरोप केला होता. या प्रकरणात सीबीआयने 20 नोव्हेंबर 2014 रोजी क्लोजर रिपोर्ट दिला होता. मात्र, तो स्वीकारण्यास न्यायालयाने नकार देत प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाने दर्डांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांना लिहिलेल्या पत्रात चुकीच्या पद्धतीने तथ्यांना सादर केल्याचाही ठपका ठेवला होता. त्यामुळे आता या आरोपींच्या शिक्षेवर 18 जुलैला सुनावणी होणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT