Sanjay Raut Criticizes Ajit Pawar: अजितदादांच्या दिल्लीवारीवर राऊतांचा टोला ; 'एकेकाळच्या स्वाभिमानी नेत्यांना..'

Maharashtra Politics : अभिमान, हिंदुत्व वगैरे वगैरे त्यांनी एका कचऱ्याच्या पेटीत त्यांनी टाकून दिला आहे.
 Ajit Pawar on Sanjay Raut
Ajit Pawar on Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील सत्तातरानंतर नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. काल (बुधवारी) अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्लीवाऱ्यावरुन ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते.

"महाराष्ट्राची लीडरशीप दिल्लीमध्ये कधीपासून गेली," असा टोला राऊतांनी लगावला आहे. "आता बदल झाला आहे. खाते वाटपापासून, निधी वाटपापर्यंत, विस्तारापासून अशा अनेक गोष्टींपर्यंत याठिकाणच्या एकेकाळच्या स्वाभिमानी नेत्यांना दिल्लीमध्ये पायधूळ झाडावी लागते आहे. आणि नेत्यांच्या धुळवडीवर जाऊन बसावं लागतं आहे. हे एक आश्चर्य आहे आणि हे ते अभिमानाने हसत हसत स्विकारतात," असे राऊत म्हणाले.

 Ajit Pawar on Sanjay Raut
Nawab Malik : नवाब मलिकांना हायकोर्टाचा दणका ; वैद्यकीय जामीन अर्ज फेटाळला

जे कोट शिवले त्याची साईज बदलली..

राऊत म्हणाले, "आम्हाला मातोश्रीवर भेट मिळाली नाही, आम्हाला पवार भेटले नाहीत, आमचं ऐकून घेत नाहीत. अशी कारणं आपण गेल्या काही दिवसांपासून ऐकत आहोत. मात्र शपथ घेऊन 11 दिवस होत आले तरी राष्ट्रवादीतल्या फुटलेल्या गटाला अजून खाती मिळाली नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी शपथ घेऊन एक वर्ष झालं, तरी त्यांच्या इतर लोकांनी जे कोट शिवले त्याची साईज बदलली, त्यांच्या शरीराची साईज बदलली तरी विस्ताराची परवानगी मिळत नाही. असा यांचा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, हिंदुत्व वगैरे वगैरे त्यांनी एका कचऱ्याच्या पेटीत त्यांनी टाकून दिला आहे,"

 Ajit Pawar on Sanjay Raut
Kukadi Water : आता बोगदा कसा होणार ; कुकडीचे पाणी पेटणार ? ; डावा कालवा सत्ताधाऱ्यांचा झाला..

असंतोषाचा भडका उठणार..

अजित पवार राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अनेक वर्ष चांगले काम केले आहे, त्याना कामाचा मोठा अनुभव आहे. अजित पवार यांना दिल्लीतील नेत्यांनी चांगल्या खात्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांना अर्थ किंवा एखादे चांगले मोठे खाते द्यावे लागणार असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले. मंत्रिमंडळाचा विस्तार करणे म्हणजे असंतोषाचा भडका उठवणे, असे होणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com