Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi Sarkarnama
देश

PM मोदींचे वारसदार कोण? दिग्गज राजकीय चाणाक्यांचा रोख नेमका कोणाकडे?

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi) यांच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या टर्मसाठी आता अवघा दोन वर्षांचा कालखंड उरला आहे. भाजपच्या (BJP) ७५ वर्ष वयाच्या लक्ष्मण रेषेमुळे पक्ष त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारीची संधी देईल का? याबाबत शंका आहेत. पण त्यापूर्वीच जर मोदी यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी घेतली नाही तर त्यांचा वारसदार कोण असणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी एका वक्तव्य केले, मात्र त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.

काँग्रेससोबतची (Congress) पक्षप्रवेशाची चर्चा फिसकटल्यानंतर प्रशांत किशोर सध्या देशभरात चर्चेत आहेत. यानंतर त्यांनी 'आज तक' वृत्तवाहिनीसोबत बोलताना पंतप्रधान मोदी यांचा वारसदार कोण यावर कोड्यात टाकणारे उत्तर दिले आहे. निवेदकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारसदार कोण असणार? असा प्रश्न किशोर यांना विचारला होता. यावर ते म्हणाले, मी नाव तर घेणार नाही, पण इतिहासानुसार बघितल्यास कोणत्याही शाहण्या माणसाला याचे लगेच उत्तर मिळेल.

प्रशांत किशोर म्हणाले, आधी आडवाणी आणि वाजपेयी यांची जोडी होती. पुढे वाजपेयी यांना मोदी यांची साथ मिळाली. त्यानंतर आता मोदी यांना अमित शहांची साथ आहे. त्यामुळे स्पष्टपणे पुढे सगळे दिसत आहे. तुम्ही कोणत्याही एका व्यक्तीचे नाव सांगू शकत नाही. मात्र येणाऱ्या लोकांबाबतचा अंदाज लावू शकतात.

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ऑफर नाकारली; नेतृत्वाचा प्रश्न सोडवण्याचा सल्ला

दरम्यान प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसची (Congress) ऑफर नाकारली असून काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर त्यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. पक्षाला माझ्यापेक्षा एका चांगल्या नेतृत्वाची आणि तळागाळातील अडचणी सोडवण्याची गरज असल्याच्या कानपिचक्याही त्यांनी यावेळी दिल्या. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मागील काही दिवसांमध्ये ५ ते ६ वेळा भेट घेतली होती. त्यावरुन त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित मानला गेला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT