नवी दिल्ली : उत्तरप्रदेशात जनपद बांदा येथे विधानसभेच्या (Uttar Pradesh Legislative Assembly) चार जागांसाठी निवडणूक होत आहे. या चारही जागा आम आदमी पार्टीने लढविण्याची घोषणा केली होती. पण एकाच जागेसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक न लढविताच पराभव स्वीकारावा लागला. कारण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाच नाही.
यामध्ये एका जागेसाठी दाखल करण्यात आलेला अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केला आहे. तर दुसऱ्या उमेदवार अर्ज भरण्यासाठी वेळेत न पोहचल्यामुळे त्याला अर्ज स्वीकारण्यात आला नाही. तर अन्य दोन्ही जागावर उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे आप आदमी पार्टीचा या चारही जागांवर आपला उमेदवार उभा करता आला नाही.
आम आदमी पार्टीचे बांदा जिल्हाध्यक्ष अवधेश कुमार सिंह यांना पहिल्यांदा तिंदवारी विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण त्यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून आपण ही निवडणूक न लढविण्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आप आदमी पार्टीने या जागेवर अवधेश कुमार सिंह यांच्याऐवजी अरुण कुमार शुक्ला यांना उमेदवारी जाहीर केली. पण अरुण कुमार सिंह यांनी आपला अर्ज भरला नाही. यामुळे निवडणुकीच्या मैदानातून हे दोन्ही उमेदवार निवडणूक न लढवत पळून गेल्याची चर्चा या परिसरात आहेत. ''माझी विचारसरणी ही पक्षाच्या विचारसरणीशी जुळत नसल्याने मी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे, '' असे अरुण कुमार शुक्ला यांनी सांगितले.
माखनलाल तिवारी यांना पक्षाने बबेरु विधानसभेसाठी उमेदवारी दिली होती. पण माखनलाल तिवारी हे अर्ज भरण्याच्या अंतिम वेळेत पोहचू शकले नाहीत. वेळ संपल्यामुळे त्यांना अर्ज भरता आला नाही. बांदा मतदार संघातून विनय गुप्ता यांनी अर्ज दाखल केला होता. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. हा सर्व प्रकार सत्ताधारी पक्षाचे कटकारस्थान असल्याचा आरोप अवधेश कुमार सिंह यांनी केला आहे. विनय कुमार यांचा अर्ज सत्ताधारी पक्षाच्या दबाबाखाली बाद करण्यात आला असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.
देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने आज नवीन मार्गदर्शक तत्वे (new guidelines) जाहीर केली आहेत. प्रचारादरम्यान वाहनांच्या रॅली, रोड शो, पदयात्रा, मिरवणुका काढण्यावरील बंदी कायम आहे. मात्र इनडोअर आणि आऊटडोअर बैठकांसाठी निवडणूक आयोगाने काही सवलती दिल्या आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने आज नोटीस काढली आहे. (Election Commission New Guidelines)
''आयोजक आणि संबंधित राजकीय पक्षांना वरील सर्व सूचना आणि SDMA संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. कोविड संबंधित प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वांचे कोणतेही उल्लंघन झाल्यास आयोजक जबाबदार असतील, असे निवडणूक आयोगाने आपल्या नोटिशीमध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.