बारामती : मोठी माणसं खऱ्या अर्थाने तितक्या उंचीची असतात. गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या वेगळ्या उंचीवर पोहोचूनही किती विनम्र होत्या याचा एक किस्सा बारामतीतील छायाचित्रकार शाम शिंदे यांनी आज नमूद केला.
ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निमंत्रणावरुन काही वर्षांपूर्वी लतादीदींनी बारामतीला भेट दिली होती. विद्या प्रतिष्ठान संकुलामध्ये त्यांना गौरविण्यात आले होते. त्या वेळेस त्यांना एक सुंदर स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर या कार्यक्रमाचे फोटो पाहताना शरद पवार यांना या स्मृतीचिन्हाचाच कोठे फोटो नसल्याचे लक्षात आहे.
त्यांनी शाम शिंदे यांना बोलावून 'हा फोटो का नाही' असे विचारले असता 'कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे मी व्यासपीठापर्यंत जाऊच शकलो नाही,' असे त्यांनी सांगितले. त्यांना तो फोटो आपल्या संग्रहात असायला हवा असे वाटले, त्यांनी थेट लतादीदींनाच फोन लावला आणि त्या स्मृतीचिन्हाचा फोटो काढायला शाम शिंदे येतील असा निरोप दिला.
दुस-याच दिवशी शाम शिंदे पुण्यातील लतादीदींच्या घरी पोहोचले. लतादीदींनी शाम शिंदे यांना बसवून घेतले. काय घेणार..असे विचारल्यानंतर शाम शिंदे यांनाच काही सुचत नव्हते, शेवटी काहीतरी घ्यावेच लागेल असा आग्रह झाल्यावर त्यांनी चहा सांगितला. चहा येईपर्यंत दीदींनी शाम यांना त्यांच्या व्यवसायाची कुटुंबाची माहिती आस्थेने विचारली. वडील किती जुन्या काळापासून कसे फोटो काढायचे हे शाम यांनी सांगितल्यावर त्यांनी कुतूहलाने अधिक चौकशी केली.
इतकी मोठी व्यक्ती घरात आपल्या शेजारी सोफ्यावर बसवून आपली चौकशी करत आहे या जाणीवेनेच मी भारावून गेलो होतो....त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा हा क्षण आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही. स्मृतीचिन्हाच्या छायाचित्राच्या निमित्ताने काही मिनिटांचाच त्यांचा सहवास लाभला आणि इतकी मोठी व्यक्ती किती विनम्र आहे हे जाणवले....आज लतादीदींच्या जाण्याने एका विनम्र व्यक्तिमत्वाला आपण मुकलो असल्याचे शाम शिंदे म्हणाले.
कोल्हापुरातील साड्या, बांगड्या, अन् ते चुरमुरे दीदी कधीच विसरल्या नाहीत!
कोल्हापूर : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. अनेक मान्यवरांची त्यांच्या आठवणी सांगितल्या. लतादीदींचे स्नेही श्रीकांत डिग्रजकर यांनी त्यांच्या आठवणींनी उजाळा दिला आहे. लतादीदींच्या अनेक पत्रांचा संग्रह श्रीकांत डिग्रजकर यांच्याकडे आहे. कोल्हापुरातील पोरे ब्रदर्स, इंगळे साडी हाऊस, हुपरी ऑर्नामेंट, माहेर बॅगल्स, गंगाराम यांच्या दुकानातील चुरमुरे अशा अनेक आठवणी लतादीदींच्या कोल्हापुरात आहेत. मुंबई मुक्कामी पेढे खाण्याची किंवा चुरमुरे खाण्याची इच्छा झाली की कोल्हापूरला निरोप पाठवून अजूनही हे पार्सल मागवून घ्यायच्या.आजही ही ठिकाणे कोल्हापुरात आहेत. त्यांच्या पुढच्या पिढ्या हे व्यवसाय सांभाळत आहेत. लतादीदींची कोल्हापुरातील ही खरेदीची आवडती ठिकाणे असल्याचा त्यांनाही खूप आनंद व अभिमान आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.