Manmohan Singh-Sanjay Singh Sarkarnama
देश

Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची आम आदमी पक्षाची मागणी

Bharat Ratna for Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग हे 2004 आणि 2009 असे दोन टर्म देशाचे पंतप्रधान होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार डॉ. सिंग यांनी चालवले. त्यांच्याच कार्यकाळात वीजक्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार झाला होता.

Vijaykumar Dudhale

New Delhi, 27 December : देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना भारतरत्न देऊन त्यांच्या कामाचा गौरव करण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी केली आहे.

डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) हे २००४ आणि २००९ असे दोन टर्म देशाचे पंतप्रधान होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार डॉ. सिंग यांनी चालवले. त्यांच्याच कार्यकाळात वीजक्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार झाला होता. त्यातून देशाला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 वर्षी दिल्लीतील (Delhi) एम्स रुग्णालयात 26 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली. डॉ. सिंग यांच्या निधनामुळे देश एका मोठ्या अर्थतज्ज्ञाला मुकला आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. हा दुखवटा 26 डिसेंबर ते 1 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होत नाहीत. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन हे एका युगाचा अंत झाल्यासारखे आहे. त्यांचे जीवन हे साधेपणा, समर्पण आणि सेवेचे प्रतीक होते. त्यांचे योगदान आणि बलिदान सदैव देशवासीयांच्या हृदयात राहील. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि परिवाराला हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो, असेही सिंह यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेचे माजी गर्व्हनर आणि माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना भारत रत्न देऊन त्यांचा कामाचा गौरव करण्यात यावा, अशी मागणीही खासदार संजय सिंह  यांनी केली आहे. खासदार संजय सिंह यांची मागणी देशातील भाजप सरकारकडून पूर्ण केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT