
Mumbai News : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 92 व्या वर्षी निधन झाले.गुरूवारी रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण त्यानंतर काही तासांतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधानानंतर सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
तसेच सरकारकडून देशात सात दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला. याचदरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकीकडे सिंग यांच्या कारकीर्दीचे कौतुक करतानाच केंद्रातील मोदी सरकारला टोले लगावले आहेत.
संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता.27)सकाळी मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या निधनावरही भाष्य केलं. ते म्हणाले, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशाची हानी झाली आहे. आपली अर्थव्यवस्था गेल्या दहा वर्षांत इतके अडथळे येऊनही टिकून आहे. सध्याच्या सरकारने अर्थव्यवस्थेला एवढे सुरुंग लावले, तरी ती टिकून आहे याचं सर्व श्रेय मनमोहन सिंग यांना जाते, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
याचवेळी त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला दिलेल्या अर्थशास्त्रज्ञ म्हणून दिलेले सर्व इशारे अगदी खरे ठरले. नोटाबंदीमुळे देशाचा जीडीपी घसरेल असे अनेक इशारे त्यांनी दिले आणि ते खरे ठरले. सोळा दिवस पुरेल इतका पैसे असताना नरसिंहराव यांनी अर्थखातं त्यांना दिलं होतं. पण त्यांनी ते सक्षमपणे हाताळलं, असे कौतुकोद्गारही खासदार राऊत यांनी काढले.
संजय राऊत यांनी पंतप्रधानांनाही खोचक टोला लगावला. ते म्हणाले, आज नरेंद्र मोदी हे फुकट धान्य देत आहेत, कोणीही उपाशी राहणार नाही प्रत्येकाच्या घरात चूल पेटते, असं म्हणतात,पण ही योजना मनमोहन सिंग यांची आहे. त्यांनी अन्नसुरक्षा कायदा आणला होता.अशा अनेक योजना त्यांनी देशाच्या जनतेसाठी आणल्या.
अत्यंत प्रामाणिक आणि त्यांचा बोलबाला शेवटपर्यंत टिकला.मुंबईचा विशेष त्यांच्या प्रेम होतं. त्यांनी गव्हर्नर म्हणून काम केलं. जे आता मेट्रो दिसत आहे, त्याचं श्रेय मी डॉक्टर मनमोहन सिंग यांना देईन. पहिला उद्घाटन त्यांनी केलं होतं. आम्ही प्रधानमंत्री म्हणून सुद्धा पार्लमेंट त्यांच्याशी आमच्या संवाद राहिला. विरोधी पक्षात आले, तेव्हाही आमचा संवाद राहिला,असंही राऊतांनी यावेळी बोलून दाखवलं.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.कोणत्याही जाती-धर्माचा अभिनिवेश न करणारं त्यांचं काम आहे.त्यांनी कोणाशीही संवाद तोडला नाही. 250 च्या वर पत्रकार परिषद घेतल्या. कोणत्याही प्रधानमंत्री यांनी घेतल्या नाही. नरेंद्र मोदी यांनी देखील नाही.पत्रकाराच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले कोणत्याही प्रश्नांपासून पळून गेले आहे असा चिमटाही राऊतांनी यावेळी काढला.
काँग्रेस पक्षाच्या वाढीमध्ये देखील त्यांचे योगदान आहे. त्यांचे स्मरण या देशाला कायम राहील. कारण संकटात सापडलेल्या देशाला आधार देण्याचा काम त्यांनी केलं. ते संसदेत यायचे प्रधानमंत्री म्हणून आणि फार मोकळेपणाने वागायचे.प्रत्येक वेळेला ठाकरेजी कैसे हे आणि उद्धवजी कसे आहेत विचारायचे. इतका मोठा माणूस आम्हाला ओळखतो की नाही,पण ते आम्ही समोर गेलो की, आम्हाला नावाने ओळखायचे. या पृथ्वी तलावावरील ते देवदूत होते, असेही राऊत यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.