Aam Aadmi Party Madhya Pradesh: Sarkarnama
देश

Aam Aadmi Party: दिल्लीतील पराभवानंतर AAP ला घरघर! पक्ष कार्यालयाला ठोकले टाळे; काय आहे कारण

Aam Aadmi Party Madhya Pradesh: देशातील मोठा पक्ष असलेल्या पक्षाचे कार्यालयावर भाडे भरण्यासाठी पैसै नसल्याची वेळ का आली, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Mangesh Mahale

दिल्ली विधानसभेत पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या अडचणीत थांबण्याचे नाव घेत नाही. आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा पराभव झाला. अशातच आता मध्य प्रदेशमध्ये पक्ष कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. भोपाळ येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयाला जागा मालकाने टाळे ठोकले आहे.

तीन महिन्याचे भाडे थकल्यामुळे मालकाने आपच्या कार्यालयावर ही कारवाई केली आहे. पक्षाचे कार्यालय हे भाडेतत्वावर आहे. देशातील मोठा पक्ष असलेल्या पक्षाचे कार्यालयावर भाडे भरण्यासाठी पैसै नसल्याची वेळ का आली, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

आपचे मध्यप्रदेशचे सचिव रमाकांत पटेल यांनी याबाबत एका वृत्तसंस्थेला स्पष्टीकरण दिले आहे. "आमचा पक्ष प्रामाणिक आहे. पक्षाच्या स्थानिक निधीतून पक्षाचे कामकाज चालते. येथील कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही, त्यामुळे पक्षाकडे निधी नाही. यामुळे तीन महिन्याचे भाडे देऊ शकत नाही," असे ते म्हणाले.

आपच्या प्रदेशाध्यक्षा रीना अग्रवाल यांना याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे समोर आले आहे. आपचे भोपाळ जिल्हाध्यक्ष सीपी सिंह चौहान यांनीही याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. यावर भाजपचे प्रवक्ता नरेंद्र सलूजा यांनी काँग्रेस आणि आपवर निशाणा साधला आहे. आपच्या कार्यालयाला टाळे लागल्यानंतर आता काँग्रेसचा नंबर आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत सत्ता गमवावी लागली. भाजपचे बहुमतासह 27 वर्षानंतर दिल्लीत आपलं सरकार स्थापन केली. एकूण 70 जागांपैकी भाजपला 48 तर भाजपला 22 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT