Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama

Dhananjay Munde: मुंडेंच्या राजीनाम्यावर फडणवीस काय निर्णय घेणार? मुनगंटीवार म्हणाले, 'कराडचा संबंध असेल तर...'

Sudhir Mungantiwar Dhananjay Munde resignation: वाल्मिक कराडचा संबंध असेल तर त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेणे गरजेचे आहे. आरोप खोटे असतील आणि त्यात काही तथ्य नसल्यास मुख्यमंत्र्यांनी याची माहिती सभागृहात द्यावी लागेल,"
Published on

Nagpur News: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा दबाव सरकारावर येऊ लागला आहे. आजपासून अधिवेशन सुरू होत असल्याने विरोधकही याच मुद्यावर सरकारला घेरणार असल्याचे दिसते. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी राजीनाम्याचा निर्णय झाला असल्याचा दावा केला आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही भाष्य केले आहे.

मुनगंटीवार म्हणाले, "धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवसात घेणार की नाही हे मला माहीत नाही. मात्र भाजप, महायुती आणि जनहितासाठी राजीनामा घेणे महत्त्वाचे आहे. यावर निर्णय घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यांच्याकडे गृह खाते आहे. पोलिस विभागाने त्यांना या संदर्भात काही माहिती दिली असेल, याशिवाय कृषी घोटाळ्याच्या आरोपावर कृषी विभागाच्या सचिवांनी त्यांना काही पुरावे दिले असतील तर ते निश्चितच निर्णय घेतील,"

"धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप हे खरे असतील, त्यांचा आणि आरोपी वाल्मिक कराडचा संबंध असेल तर त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेणे गरजेचे आहे. आरोप खोटे असतील आणि त्यात काही तथ्य नसल्यास मुख्यमंत्र्यांनी याची माहिती सभागृहात द्यावी लागेल," असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

Dhananjay Munde
Kolhapur Politics: 'शक्तीपीठ'वरून राजकारण पेटलं; क्षीरसागरांच्या टार्गेटवर सतेज पाटील

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. याच काळात सरपंच देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण घडले होते. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यनंतर एक रुपयात पिक विमा योजनेतील घोटाळ्याच्या विषय समोर आला होता. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा घोटाळा सभागृहात उजागर केला होता.

विरोधकांनीही नंतर हा घोटाळा उचलून धरला. त्यानंतर अंजली दमानिया यांनी अनेक पुरावे सादर करून कसा घोटाळा घडला याची माहिती जगजाहीर केली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठातही याचिका दाखल करण्यात आली आहे. डीबीटी डावलून चढ्या भावाने कृषी साहित्य खरेदी केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com