AAP and BJP on Delhi Election Exit Poll News : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवार) मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. यानुसार दिल्लीत यंदा सत्ता परिवर्तन होणार असल्याचं दिसून येत आहे.
बहुतांश एक्झिट पोलनुसार दिल्लीत सत्तेवर भाजप(BJP) येणार आहे, तर आम आदमी पार्टीला सत्तेतून पायउतार व्हावे लागणार आहे. याशिवाय काँग्रेस मात्र या निवडणुकीत आपलं खातं उघडू शकते, एवढच काय ते त्यांना समाधान मिळणार असल्याचं दिसत आहे.
मात्र एक्झिट पोलचे आकडे आणि अंदाज आम आदमी पार्टीने(AAP) फेटाळले आहेत. दिल्लीतील आतिशी सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले की, आम आदमी पार्टीने दिल्लीत तीन निवडणुका लढल्या आहेत. ही चौथी निवडणूक आहे. 2013, 2015, 2020 च्या एक्झिट पोलने आम्हाला पराभूत ठरवलं होतं आणि आताही आम्हाला कमी जागा दाखवत आहेत. एक्झिट पोल आम्हाला कमी लेखत आले आहेत.
ग्रेटर कैलाश मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे उमेदवार असलेल्या भारद्वाज यांनी सांगितले की, याचे मोठे कारण हे आहे की सर्वसामान्यांचा आवाज भाजपचे जे दबंग आहेत, ते दाबतात. एक सर्वसामान्य माणूस एक्झिट पोलमध्ये काहीच सांगत नाही. आम आदमी पार्टीचा मतदानाच टक्का, अंदाजापेक्षाही अधिक असतो. मी सर्व भाग फिरलो आहे, तर लोकांनी आपच्या बाजूने कौल दर्शवला आहे. दिल्लीत मोठ्या बहुमताने पुन्हा एकदा आम आदमी पार्टीचे सरकार बनणार आहे. सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होणार आहेत.
एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यावरही भाजपे अधिक ठामपणे सांगितले आहे की , दिल्लीत भाजपचे सरकार सत्तेवर येणार आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले की, दिल्तील भाजपचे डबल इंजनचे सरकार बनणार आहे. आपदा जात आहे भाजप येत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.