Delhi Vidhan Sabha Election 2025 : दिल्लीत यंदा काँग्रेस ठरणार 'किंगमेकर'? ; BJP की AAP कुणाला होणार नेमका फायदा!

Congress and Delhi Vidhan Sabha Election 2025 : जाणून घ्या, राजकीय जाणकारांच्या मते काँग्रेसच्या कामगिरीवरून नेमकं काय असेल सत्तेचं समीकरण.
Delhi Vidhansabha Election 2025
Delhi Vidhansabha Election 2025 Sarkarnama
Published on
Updated on

Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज (5 फेब्रुवारी) मतदान पार पडत आहे. यंदा दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टी आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर दिल्लीच्या सत्तेपासून अनेक वर्षे दूर असलेली भाजप या निवडणुकीत विजय मिळवून आपला 27 वर्षांचा वनवास संपवू इच्छित आहे.

तसेच या निवडणुकीत काँग्रेस(Congress) पक्षही कंबर कसून मैदानात उतरला आहे. काँग्रेसनेही अन्य प्रमुख पक्षांप्रमाणे मतदारांसाठी मोफत योजनांची घोषणा केलेली आहे. मात्र तरीही यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी विरुद्ध भाजप अशीच थेट लढत दिसून येत आहे. मात्र वस्तूस्थिती अशी आहे की या निवडणुकीतील काँग्रेसच्या निकालावर दिल्लीत कोणत्या पक्षाचे सरकार असणार हे ठरण्याची चिन्हं आहेत.

Delhi Vidhansabha Election 2025
Arvind Kejriwal News : केजरीवालांनी दिल्लीत आम आदमी पार्टीला मिळणाऱ्या जागांचा थेट आकडाच सांगितला अन् म्हणाले...

जून 2024 संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या अंतर्गत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने जागा वाटप करून भाजप(BJP)विरोधात निवडणूक लढवली होती. परंतु सहा महिन्यानंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एक दुसऱ्याच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ज्यामुळे यंदाची दिल्ली विधानसभा निवडणूक अधिकच मनोरंजक मानली जात आहे.

काँग्रेसमुळे दिल्लीत आम आदमी पार्टीचे(AAP) दोनदा सरकार आले. विशेष म्हणजे दिल्लीतील मागील निवडणुकीत आम आदमी पार्टीची जी दिल्लीत पाळेमुळं मजबूत झाली, त्याचे सगळे श्रेय काँग्रेसलाच जाते. स्पष्टच सांगायाचं झालं तर, दिल्लीत आम आदमी पार्टीने काँग्रेसची जागा घेतली आहे.

Delhi Vidhansabha Election 2025
Delhi Election and Exit Poll : दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी 'एक्झिट पोल'बाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!

राजकीय जाणकारांचे मत आहे की, यंदाच्या दिल्ली निवडणुकीत जर आम आदमी पार्टीचं दमदार प्रदर्शन राहिलं तर, अशा स्थितीत भाजपला फायदा होवू शकतो. कारण, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची व्होट बँक सारखीच आहे. मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत यंदा काँग्रेस जर काही जागांवर चांगली कामगिरी करत असेल, तर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये जागा विभागतील ज्याचा थेट फायदा भाजपला होईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com