Gyan Singh Mann joins the BJP in the presence of Nayab Singh Saini and Sunil Jakhar during a political event. Sarkarnama
देश

Bhagwant Mann latest news : भाजपचा 'आप'ला जोरदार झटका; सात खासदारांनंतर आता थेट मुख्यमंत्री मान यांचेच घर फोडले...

Gyan Singh Mann joins BJP, Bhagwant Mann cousin : मागील महिन्यात राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी 'आप'ला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Rajanand More

Punjab political news : आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील सात खासदारांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी सहा खासदार हे पंजाबमधून निवडून गेले आहेत. त्यामुळे आपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. त्यानंतर काही काही दिवसांतच भाजपने पक्षाला दुसरा झटका दिला आहे. यावेळी थेट मुख्यमंत्री भगवंत मान यांचेच घर फोडले आहे.

भगवंत मान यांचे चुलत बंधून ज्ञान सिंह मान यांनाच भाजपने पक्षात आणले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या उपस्थितीत ज्ञान सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत आपच्या अन्य काही पदाधिकाऱ्यांनी कमळ हाती घेतले आहे. मुख्यमंत्री मान यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. कुटुंबातील सदस्यच साथ सोडत असल्याची टीकाही आता सुरू झाली आहे.

पंजाबमधील पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. त्याआधी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्याआधीच भाजपने आपला धक्के देण्यास सुरूवात केली आहे. पाच राज्यांतील निवडणुका संपताच भाजपने आता मिशन पंजाब असे म्हणजे पंजाबमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी बिगुल फुंकले होते. त्याची सुरूवात मान यांचे घर फोडून करण्यात आली आहे.

ज्ञान सिंह यांना आम आदमी पक्षाचे रणनीतीकार म्हणूनही ओळखले जात होते. मात्र, त्यांनी यापूर्वी अनेकदा सोशल मीडियासह सार्वजनिक व्यासपीठावरही सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश आपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

मागील महिन्यात राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी 'आप'ला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपची राज्यातील ताकद वाढली आहे. दुसरीकडे राज्यात भाजपचे सध्या केवळ दोन आमदार आहेत. मात्र, राज्यसभेचे सात खासदार आल्याने भाजपचे कार्यकर्ते व नेत्यांचे मनोबल वाढल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT