CM Vijay news : तमिळनाडूत मोठी घडामोड; CM विजय यांनी आधी DMK आघाडीतील मित्रपक्षांना फोडलं अन् आज थेट स्टॅलिन यांची गळाभेट...

MK Stalin latest news, Udhayanidhi Stalin news : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मंगळवारी आमदारांना पदाची शपथ देण्यात आली.
M. K. Stalin and Udhayanidhi Stalin greet Vijay with a warm hug during a meeting at their residence in Chennai.
M. K. Stalin and Udhayanidhi Stalin greet Vijay with a warm hug during a meeting at their residence in Chennai.Sarkarnama
Published on
Updated on

Vijay Stalin meeting : तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाने डीएमकेची सत्ता उलथवून टाकत आपला झेंडा फडकविला आहे. विजय यांना एकहाती सत्ता काबीज करता न आल्याने त्यांनी डीएमके आघाडीत असलेल्या पक्षांना फोडून आपल्यासोबत घ्यावे लागले. त्यानंतर बऱ्याच घडामोडींनी रविवारी शपथविधी झाला. याचदिवशी विजय यांनी दहा लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा काढत माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना डिवचले होते. त्यावर स्टॅलिन यांनीही लगेच पलटवार केला होता.

मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर विराजमान होत असतानाच विजय यांनी डीएमके आणि स्टॅलिन यांचा रोष ओढवून घेतला. तसेच व्हीसीके या मित्रपक्षानेही कर्जाच्या मुद्द्यावरून विजय यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. टीव्हीके आणि डीएमके या दोन पक्षांमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच सोमवारी तमिळनाडूत मोठी राजकीय घडामोड घडली.

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मंगळवारी आमदारांना पदाची शपथ देण्यात आली. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर विजय यांनी थेट स्टॅलिन यांचे चेन्नईतील निवासस्थान गाठले. तिथे स्टॅलिन यांचे पुत्र आमदार उदयनिधी यांनी विजय यांचे स्वागत केले. विजय यांची गळाभेट घेत उदयनिधी यांनी त्यांना घरात नेले. त्यानंतर स्टॅलिन यांनाही विजय भेटले.

M. K. Stalin and Udhayanidhi Stalin greet Vijay with a warm hug during a meeting at their residence in Chennai.
CM Vijay news : मुख्यमंत्रि‍पदाचा कार्यभार हाती घेताच विजय यांचे 4 धडाकेबाज निर्णय; राहुल गांधींसमोरच स्टॅलिन यांना दिला पहिला झटका

एम.के. स्टॅलिन यांनीही विजय यांची गळाभेट घेतली. तसेच त्यांच्या हातात हात घालून आसनापर्यंत नेले. दोघांनीही एकमेकांना शाल आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले. त्यानंतर स्टॅलिन पितापुत्रासोबत काहीवेळ विजय यांच्या गप्पा रंगल्या होत्या. ही सदिच्छा भेट असल्याचे मुख्यमंत्र्‍यांच्या टीव्हीके पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले.

M. K. Stalin and Udhayanidhi Stalin greet Vijay with a warm hug during a meeting at their residence in Chennai.
CM Vijay update : बहुमत सिध्द करण्याआधीच विजय यांनी एक मतदारसंघ सोडला, एका आमदाराचे पदही धोक्यात

दरम्यान, ही औपचारिक भेट असली तरी त्याला महत्व प्राप्त झाले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत टीव्हीके पक्षाच्या उमेदवारानेच स्टॅलिन यांचा पराभव केला आहे. टीव्हीकेच्या लाटेत डीएमकेचे गड ढासळले आहेत. अनेक मंत्र्‍यांचा पराभव झाला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात आक्रमक प्रचार करण्यात आला होता. तर निकालानंतर विजय यांनी डीएमकेचे पाच मित्रपक्ष फोडत त्यांचा पाठिंबा मिळविला आहे. त्यामुळे स्टॅलिन यांची आजची भेट याअनुषंगाने महत्वाची मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com