Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : 'आप'च्या पराभवाचा पंजाबमध्ये परिणाम! ; केजरीवालांनी तातडीने बोलावली मंत्री अन् आमदारांची बैठक

AAP Punjab MLA and Congress : पंजाबमध्ये 'आप'चे आमदार संपर्कात असल्याचा काँग्रेस नेत्यांकडून दावा केला गेला आहे.

Mayur Ratnaparkhe

Arvind Kejriwal Call Punjab MLA Meeting : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा भाजपकडून दारूण पराभव झाला आहे. तर दिल्ली निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर आता आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी 11 फेब्रुवारी रोजी दिल्लीत पंजबाच्या आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक दिल्लीतील कपूरथला हाउसमध्ये होणार आहे. सर्व आमदारांना याबाबत कळवण्यात आले आहे अन् 11 फेब्रुवारीचे आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्याची सूचनाही केली गेली आहे.

अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी ही बैठक काँग्रेस नेते आणि पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रतापसिंह बाजवा यांच्या त्या दाव्यानंतर बोलावली आहे, ज्यात त्यांनी म्हटले होते की, जवळपास 30 आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत. बाजवा शिवाय काँग्रेसच्या काही अन्य नेत्यांनीही आम आदमी पार्टीचे आमदार संपर्कात असल्याचे म्हटलेले आहे. आम आमदी पार्टी आधीही भाजपवर पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस अंतर्गत त्यांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत आलेली आहे. मात्र यावेळी तर काँग्रेसच्या नेत्यांकडून आम आदमी पार्टीचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला गेला आहे.

तर भगवंत मान(Bhagwant Mann) हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत तंबू ठोकून होते. ते 9 फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये पोहचले. यानंतर तत्काळ सोमवारी होणारी कॅबिनेट बैठक 13 फेब्रुवारी पर्यंत स्थगित केले गेली आहे. पंजाबमध्ये मागील चार महिन्यांमध्ये ही पहिली कॅबिनेट बैठक असेल, जी या आधी 6 फेब्रुवारी रोजी ठरवण्यात आली होती. मात्र नंतर ती 10 फेब्रुवारी पर्यंत टाळली होती. दिल्ली निवडणुकीत निराशाजनक कामगिरीनंतर आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाचे लक्ष्ये हे आता पंजाबर केंद्रीत झाले आहे. कारण, तेवढेच एकमेव राज्या आहे जिथे त्यांच्या पक्षाचं सरकार आहे.

तसं पाहीलं तर, या बैठकीचा अजेंडा गुप्त ठेवण्यात आला आहे. मात्र असा अंदाज वर्तवला जात आहे की, केजरीवाल या बैठकीत पंजाबमधील आमदारांना दिल्लीतील पराभवामुळे खचून न जाण्यास सांगतील. केजरीवाल आमदारांना सांगू शकतात की त्यांनी सत्तेची हवा डोक्यात जावू न देता सर्वसामान्य जनतेशी आपले नातं अधिकाधिक घट्ट ठेवावे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक आता 2027मध्येच होणे निश्चित आहे. 2022च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने (AAP) 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 92 जागा जिंकून प्रचंड बहुमताने राज्यात सत्ता काबीज केली होती.

तर दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना, जिथे भाजपा 27 वर्षानंतर सत्तेत आली आहे आणि आम आदमी पार्टीचे एक दशकाहून अधिक काळचे शासन संपुष्टात आणले. पंजाबचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंह बाजवा यांनी दावा केला की ते राज्यातील आम आदमी पार्टीच्या आमदारांसोबत बराच काळापासून संपर्कात आहेत.

एवढच नाहीतर त्यांनी दावा केला की आम आदमी पार्टीच्या आमदारांना जाणीव झाली आहे की, पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष सत्तेत परत येणार नाही. तर अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही पंजाबमध्ये आम आदम पार्टीत फूट आणि राज्यात सरकारमधील फेरबदलाची भविष्यवाणी केलेली आहे.

प्रतापसिंह बाजवा यांनी म्हटले की, दिल्लीचा निकाल आम आदमी पार्टीच्या अस्ताच्या सुरुवातीकडे इशारा करत आहे. पंजाबच्या लोकांनी तथाकथित कट्टर इमानदार पार्टीचा खरा चेहराही बघितला आहे. केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबींना फसवलं आणि 2022 मध्ये त्यांची मतं मिळवण्यासाठी पंजाबमध्ये मोठमोठी आश्वासनं दिली. एवढच नाहीतर काँग्रेस नेत्यानने असाही दावा केला की, अरविंद केजरीवाल सध्या रिक्त जागा असलेल्या लुधियानातून निवडणूक लढण्याची आणि पंजाब सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT