Amritpal Singh Surrender
Amritpal Singh Surrender Sarkarnama
देश

Amritpal Singh arrest : अमृतपालबाबत पंजाब सरकार कुठलीही तडजोड करणार नाही : आपच्या नेत्यांनी..

सरकारनामा ब्यूरो

Amritpal Singh arrest: 'वारिस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या अटकेनंतर राजकारण तापण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन केंद्र व पंजाब सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आम आदमी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे

आम आदमी पार्टी (AAP)चे नेता, राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले, "पंजाबमधील आपचे सरकार कुठल्याही परिस्थितीत पंजाबमधील शांतता भंग होऊ देणार नाही. जनतेची सुरक्षा ही आमच्यासाठी महत्वाची आहे. आम्ही दाखवून दिले आहे की गरज पडल्यावर आम्ही कठोर कारवाई करु शकतो. आता जनतेनं शांतता राखावी,"

दिल्लीच्या शिक्षणमंत्री, आपच्या नेत्या आतिशी म्हणाल्या , "अमृतपालची अटक ही पंजाब पोलीस, मान सरकार यांची महिन्याभरच्या प्रयत्नाचे यश आहे. मी पंजाब पोलीस आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांचे अभिनंदन करते. वर्षभरापासून पंजाब पोलीस अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत होती.

आम आदमी पक्षाच्या प्रवक्ता प्रियंका कक्कड म्हणाल्या, "पंजाब पोलिसांनी खूप परिश्रमानंतर अमृतपाल याला पकडण्याची मोहीम यशस्वी करुन दाखवली आहे. पंजाब पोलीस आणि येथील जनता त्यासाठी अभिनंदनास पात्र आहे.

मंत्री सौरभ भारव्दाज यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "धर्म आणि जातीच्या पलिकडे जाऊन पंजाबमधील जनतेनं अमृतपालला पकडण्यासाठी मदत करणं कौतुकास्पद आहे," असे भारद्वाज म्हणाले.

पंजाब पोलिसांनी आज (रविवारी) खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याला मोगा येथून अटक केली आहे. अमृतपालला रोडे गावातील गुरुद्वारातून अटक करण्यात आली.

भटिंडा विमानतळावरून अमृतपालला विमानाने आसाममधील दिब्रुगड तुरुंगात नेण्यात आले आहे. अमृतपालवर NSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृलपालच्या अटकेवरुन आता राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेसचे अमृतपालच्या अटकेवरुन केंद्र सरकार, पंजाब सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र आणि पंजाब सरकारला याबाबत जाब विचारला आहे. सुरजेवाला यांनी सहा प्रश्न उपस्थित केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT