Amritpal Singh News : अमृतपालचं असं होत 'लेडी नेटवर्क' ; महिलांच्या मदतीनं देत होता IB अन् पोलिसांना गुंगारा...

Amritpal Singh lady network : 'लेडी नेटवर्क'च्या माध्यमातून अमृतपाल सहजपणे पोलिसांना ३६ दिवस गुंगारा देत राहिला.
Amritpal Singh News
Amritpal Singh News Sarkarnama

Amritpal Singh lady network : 'वारिस पंजाब दे'संघटनेचा प्रमुख, खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याला रविवारी सकाळीच पंजाब पोलिसांनी मोगा येथून अटक केली. अमृतपालला रोडे गावातील गुरुद्वारातून अटक करण्यात आली.

अटक करण्यापूर्वी अमृतपाल गुरुद्वारामध्ये प्रवचन देत होता.अमृतपालला भटिंडा विमानतळावरून विमानाने आसाममधील दिब्रुगड तुरुंगात नेण्यात आले आहे. अमृतपालवर NSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृतपाल ३६ दिवसापासून पोलीस, तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. गोपनीय माहिती मिळाल्यानंतरही तो पोलिसांच्या हातातवर तुरी देऊन निसटून जात असे. या सर्व प्रकारात त्याला मदत करणारी कोणती यंत्रणा होती, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या अटकेनंतर आता अनेक मोठे खुलासे पोलीस तपासात बाहेर येत आहे.

अमृतपालला इच्छित स्थळी पोहचविण्यासाठी 'लेडी नेटवर्क' मदत करीत होते, अशी माहिती समोर येत आहे. 'लेडी नेटवर्क'च्या माध्यमातून अमृतपाल सहजपणे पोलिसांना ३६ दिवस गुंगारा देत राहिला.

Amritpal Singh News
Ankita Dutta News : प्रियंका गांधींचा 'लड़की हूं, लड़ सकती हूं' चा नारा खोटा ठरला ; छळवणूक प्रकरणी महिला पदाधिकाऱ्याची हकालपट्टी..

होशियारपुर येथे अमृतपाल लपला असल्याची अचूक माहिती पोलिसांनी मिळाली होती. पंजाब पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. पण तो कार सोडून पसार झाला. अनेक वेळा पोलीस त्याच्याजवळ पोहचले, पण तो निसटून जायचा.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल आणि त्याचा साथीदार पपलप्रीत हे दोघेही पहिल्यांदा 'लेडी नेटवर्क'चा उपयोग करुन पटियाला येथे राहिले. पपलप्रीत याने हरियाणात आपली मैत्रीण बलजीत कौर हिच्या घरी मुक्काम केला होता. तेथे बलजीत कौर आणि तिच्या भावाच्या फोनवरुन या दोघांनी आपल्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क केला होता. येथेच त्यांनी पळून जायची आणि पुढील प्रवाशांची रणनीती आखली होती.

त्याचप्रकारे पपलप्रीत हा अमृतपाल याला घेऊन दिल्लीत एका मैत्रीणीकडे गेला होता. पपलप्रीत याच्या जवळपास १० मैत्रीण या तपास यंत्रेणेच्या रडारवर आहेत. त्यात दिल्लीमधील तीन मैत्रिणींचा समावेश आहे. त्यांची चौकशी करण्यात आली.

Amritpal Singh News
Karnataka Election : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या BJP उमेदवाराकडून २१ लाखाची रोकड, चांदीच्या वस्तू जप्त..

पोलिसांना असा देत होता चकवा

हरियाणा मध्ये जेव्हा पपलप्रीतच्या मैत्रिणीकडे दोघांचा मुक्काम होता. त्यानंतर त्या मैत्रिणीला पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर हे दोघांनी रस्त्यावरील नागरिकांच्या फोनचा उपयोग केला. त्यामुळे ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

गेल्या 36 दिवसांपासून फरार अमृतपाल होता. आपल्या एका समर्थकाच्या सुटकेसाठी अमृतपालने 23 फेब्रुवारीला पंजाबमधील अजनाळा पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. या घटनेनंतर पोलिस त्याचा शोध घेत होते.

20 एप्रिल रोजी अमृतपालची एनआरआय पत्नी किरणदीप कौर यांना अमृतसर विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी रोखले होते. ती लंडनला जाणार होती. श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर किरणदीपची तीन तास चौकशी करण्यात आली. यानंतर किरणदीपची सुटका करण्यात आली.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com