AAP Leader Atishi Sarkarnama
देश

AAP Minister Atishi News : अतिशी हाजिर हो! केजरीवालांचा आणखी एक मंत्री अडचणीत, कोर्टाने पाठवली नोटीस

Delhi Court News : भाजपने अतिशी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी कोर्टाने आतिशी यांना नोटीस बजावून सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

Rajanand More

New Delhi News : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सध्या अंतरिम जामिनावर जेलबाहेर आहेत. त्यांना दोन जूनला पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे. माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियाही जेलमध्येच आहेत. खासदार संजय सिंग काही दिवसांपुर्वीच जेलमधून बाहेर आले आहेत. आता दिल्ली सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. (AAP Minister Atishi)

आपच्या नेत्या व मंत्री अतिशी यांना दिल्लीतील राउज अव्हेन्यू कोर्टाने एका मानहानीच्या प्रकरणात नोटीस बजावली आहे. त्यांना 29 जूनला कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. भाजपकडून (BJP) आपच्या आमदारांना पैसे देऊन फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अतिशी यांनी केला होता. (Atishi Latest News)

आतिशी यांच्या आरोपांनंतर भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. हा दावा कोर्टाने आज स्वीकारला असून त्यानंतर आतिशी यांना कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना 29 जूनला हजर राहावे लागणार आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपच्या प्रमुख नेत्यांपैकी आतिशी यांचे नाव घेतले जाते. केजरीवालांच्या सर्वाधिक विश्वासून मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी इतर मंत्र्यांच्या सहकार्याने सरकार चालवले होते. याच काळात त्यांनी भाजपवर घोडेबाजाराचे गंभीर आरोप लावले होते.

आपचे अनेक नेते तपास यंत्रणांच्या कचाट्यात अडकले आहेत. आता आतिशी यांच्यावरही मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या दाव्याची सुनावणी आणि निकालाकडे आपच्या नेत्यांचेही लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT