Prajwal Revanna News : प्रज्वल रेवण्णाने भारतात पाऊल ठेवताच..! ‘त्या’ व्हिडिओनंतर SIT लागली कामाला  

Sexual Assault Case : हसनमधील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप प्रज्ज्वल रेवण्णावर आहे. लैंगिक शोषणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
Prajwal Revanna
Prajwal Revanna Sarkarnama

Karnataka Politics : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कर्नाटकातील देवेगौडा कुटुंब चांगलेच अडचणीत आले आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी (Sexual Assault Case) माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू व खासदार प्रज्ज्वल रेवण्णा (Prajwal Revanna News) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण ते सध्या परदेशात असून चौकशीला सामोरे जाण्यासाठी 31 तारखेला भारतात येणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथकही कामाला लागले आहे.

एच. डी. देवेगौडांसह (HD Devegowda) माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनीही प्रज्ज्वल यांना भारतात परत येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी सोमवारी आपण 31 तारखेला भारतात (India) येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते परदेशात पळून गेल्याची चर्चा होती. पण आपला नियोजित दौरा होता, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. (Latest Political News)

Prajwal Revanna
India Alliance Meeting : 'इंडिया'ची बैठक 1 जूनला बोलावण्यामागे काय असेल काँग्रेसची रणनीती? 5 मुद्दे समजून घ्या...

सोमवारी त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याबाबत सांगितले होते की, माझ्याविरोधात एक राजकीय षडयंत्र रचलं गेलं. शुक्रवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता मी एसआयटी (SIT) समोर हजर होवून, तपासाशी निगडीत सर्व माहिती देईन. मी तपासात सहकार्य करेन, माझा न्यायपालिकेवर विश्वास आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रज्ज्वल भारतात येणार असल्याने राज्य सरकारने त्यांना थेट अटक करण्याची तयारी केली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले की, लैंगिक छळाचे आरोप झाल्यानंतर प्रज्ज्वल परदेशात पळून गेले. ते भारतात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर त्यांना अटक करण्यात येईल. त्यांना अटक कुठे करायचा याचा निर्णय एसआयटीकडून घेतला जाईल.

सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 28 एप्रिलला एसआयटीची स्थापना केली आहे. प्रज्ज्वल हे पुन्हा चौकशीला सामोरे गेले नाहीत तर कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. मी त्यांचा व्हिडिओ पाहिला. त्यांना कुणी व्हिडिओ करायला सांगितले, माहिती नाही. त्यांच्याविरोधात आधीच ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. एसआयटीने नोटीस बजावली आहे. आरोपपत्रही दाखल केले जाईल. पण सध्या सत्य समोर आणणे आमच्यासाठी गरजेचे आहे, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Prajwal Revanna
Arvind Kejriwal: दोन जूनपासून केजरीवालांचा मुक्काम पुन्हा तिहार जेलमध्ये? सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com