Satyendra Jain latest news
Satyendra Jain latest news sarkarnama
देश

Satyendra Jain : जेल नव्हे रिसॉर्ट..; भाजपकडून सत्येंद्र जैन यांचा नवा व्हिडिओ व्हायरल

सरकारनामा ब्युरो

Satyendra Jain : दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन सध्या तिहार कारागृहात आहेत. त्याचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Satyendra Jain latest news)

एक व्यक्ती जैन यांना जेवण घेऊन येत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे, हा व्हिडिओ १३ सप्टेंबरचा आहे. भाजपने बुधवारी या व्हिडिओ व्हायरल केला आहे. याआधी त्यांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये त्यांची जेलमध्ये मसाज केली जात होती.

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक असलेले सत्येंद्र जैन यांनी न्यायालयात नुकतेच सांगितले होते की त्यांना सहा महिन्यापासून त्यांना व्यवस्थित जेवण मिळत नाही, त्याचा सडेतोड उत्तर भाजपने या व्हिडिओच्या माध्यमातून दिले असल्याचे म्हटलं जात आहे.

जैन धर्मानुसार मंदिरात जाऊन पूजा केल्यानंतर जेवण केलं जाते, मी सध्या जेलमध्ये फळ आणि कच्च्या भाज्या खाऊन जीवन जगत आहे. त्यामुळे माझे २८ किलो वजन कमी झाले आहे, असे जैन यांनी न्यायालयात सांगितलं आहे. जैन यांचा हा दावा जेल प्रशासनाने खोडून काढला आहे. जैन यांचे आठ किलो वजन वाढले असल्याचे जेल प्रशासनाने म्हटलं आहे. न्यायालयाने जैन यांना याबाबतचा अहवाल देण्यास सांगितले आहे.

जैन यांना त्यांच्या धर्मानुसार जेलमध्ये जेवण मिळत नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले आहे. न्यायालयाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत."मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला पण चांगले जेवण मिळत होते, मी तर त्यांच्याइतका वाईट नाही, गेल्या १२ दिवसापासून जेल प्रशासनाने मला जैन धर्मानुसार जेवण देणे बंद केले आहे, वैद्यकीय तपासणी साठी जेलच्या बाहेर जाण्यास जाण्यास प्रशासनाने विविध कारणे देऊन नकार दिला आहे," असे जैन यांनी म्हटलं आहे.

सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये स्वादिष्ट जेवण दिले जात आहे. केजरीवाल यांनी व्हीआयपींच्या मनोरंजनाची जेलमध्ये चांगलीच व्यवस्था केली आहे. मंत्री जैन हे तुरूंगात नसून जसे काही रिसॉर्टमध्ये बसून जेवणाचा आनंद घेत असल्याचे वाटत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. त्यासाठी या नवा व्हिडिओ जारी केला आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या जेलमधील मसाज करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर भाजपने जोरदार टीका केली होती. आप पक्षाच्या वतीने व सीएम केजरीवाल यांनी आपल्या मंत्र्यासाठी विशेष व्यवस्था केल्याचा आरोप भाजपने केला होता. तेव्हा दरम्यान, भाजपच्या या आरोपाला आपने व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोध केला होता.

मंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत खराब असून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना फिजिओथेरपी दिली जात असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, काही अहवालांमध्ये कारागृह अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दावा केला आहे की, मालिश करणारा फिजिओथेरपिस्ट नव्हता, तर बलात्कारातील एक आरोपी होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT