Delhi Congress Sarkarnama
देश

Assembly Election : महाराष्ट्रातील पराभवानंतर काँगेसला दिल्लीतही झटका; केजरीवालांकडून मोठा निर्णय

Maharashtra election Results Congress AAP Arvind Kejriwal : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. 

Rajanand More

Delhi Assembly Election 2025 : हरियाणातील विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्रातही काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला. दोन्ही राज्यांमध्ये सत्ता मिळण्याची काँग्रेसला खात्री होती. मात्र, प्रत्यक्ष निकालामध्ये काँग्रेसचा हिरमोड झाला. आता पुढील वर्षी होणाऱ्या बिहार आणि दिल्लीतील निवडणुकांमध्येही पक्षाचा कस लागणार आहे. पण तारखा जाहीर होण्याआधीच काँग्रेसला दिल्लीत झटका बसला आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व विरोधी पक्षांना एकत्र केले होते. त्यामुळे आम आदमी पक्षाचाही समावेश होता. दिल्लीसह हरियाणा व गुजरातमध्ये या पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली. पण दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

आपचे राष्ट्रीय संयोजक व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले. दिल्लीमध्ये आधीच काँग्रेसची स्थिती बिकट आहे. त्यातच केजरीवालांनी आता चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. आप कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नसल्याचे केजरीवालांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दिल्लीत आप आणि भाजपमध्येच थेट लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसमध्ये राज्यात तिरंगी लढत होईल. पण काँग्रेसची सध्याची स्थिती पाहता पक्षाचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता धूसर असल्याची चर्चा आहे. मात्र, आपने लोकसभा निवडणुकीपासून काँगेससोबत सर्वच ठिकाणी आघाडी न करण्याचा निर्णय घेतला होता.

पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले होते. हरियाणा विधानसभा निवडणुकीतही हे दोन पक्ष विरोधात लढले. त्याचा मोठा फटकाही काँग्रेसला बसला. महाराष्ट्राच्या निवडणुकीत मात्र आपने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिला होता. दिल्लीत त्याच्या विपरीत निर्णय घेण्यात आल्याने प्रामुख्याने काँग्रेसलाच फटका बसणार आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT