Election Commission News : मतदान प्रक्रियेबाबत काँग्रेसच्या आरोपांना निवडणूक आयोगानेही दिले स्पष्टच उत्तर, म्हटले...

Election Commission on Congress allegations : निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळास भेटण्यासाठी वेळही दिली आहे.
Election Commission on Congress allegations
Election Commission on Congress allegationssarkarnama
Published on
Updated on

Congress and Election Commission News : एकापाठोपाठ एक निवडणुकांमधील पराभवानंतर काँग्रेससह विरोधकांनी निवडणूक निकालात डेटामध्ये गडबड असल्याचा आरोप केला होता. यास निवडणूक आयोगाने सपशेल फेटाळलं आहे. काँग्रेसच्या आरोपांना सडेतोडपणे प्रत्युत्तर देताना निवडणूक आयोगाने कोणतीही गडबड झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडली असल्याचंही सांगितलं आहे.

तसेच निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या(Congress) प्रतिनिधी मंडळास 3 डिसेंबर रोजी भेटण्यासाठी वेळ दिली आहे. याशिवाय आयोगाने काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेण्याचेही आश्वासन दिले. काँग्रेसचे प्रतिनिधीमंडळ भेटल्यानंतर निवडणूक आयोग सर्व उपस्थित प्रश्नांवर सविस्तरपणे उत्तर देणार आहे.

शुक्रवारी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत(Vidhansabha Election) डेटाशी संबंधित उणीवांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच, काँग्रेसच्या एका प्रतिनिधी मंडळास भेटीसाठी निवडणूक आयोगाकडे वेळही मागितला होता. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मुकुल वासनिक आणि रमेश चेन्निथला यांनी १२ पानी निवेदनही दिले. पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या या निवेदनात मतदानाच्या दिवशीच्या मतांच्या आकडेवारीत हेराफेरी, मतदान यादीतून हजारो नावं गायब होणे आणि प्रत्येक मतदारसंघात दहा हजार नवीन मतदारांची नावे जोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Election Commission on Congress allegations
Ravindra Dhangekar : 'निवडणुकासुद्धा हायजॅक केल्या जात आहेत'; रविंद्र धंगेकरांचा मोठा आरोप!

तर काँग्रेसच्या आरोपांवर दिल्या गेलेल्या अंतरिम उत्तरात निवडणूक आयोगाने म्हटले की, प्रत्येक टप्प्यात उमेदवार आणि त्यांच्या एजंटची सहभाग दिसत आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न झाला. मतदारयादी तयार करण्यातही सर्वच राजकीय पक्षांचे सहकार्य राहिले, मतदार यादी अद्ययावत करताना कोणत्याही प्रकारची अनियमितता होण्याची शक्यता आढळून आलेली नाही.

मतदानाच्या डेटामध्येही कोणत्याही प्रकारची उणीव नाही. आयोगाच्या वेबसाईटवर सर्व उमेदवारांसोबतच बुथस्तरीय डेटा उपलब्ध आहे. निवडणूक संपल्यानंतर सायंकाळी ५ वाजता व्होटिंग डेटा आणि अंतिम मतदान डेटामधील फरक प्रक्रियात्म आवश्यकतांमुळे आहे.

Election Commission on Congress allegations
Baba Adhav on Vinod Tawde News : तावडेंचा उल्लेख करत बाबा आढाव उद्धव ठाकरेंसमोरच म्हणाले, 'तो प्रांत राऊतांचा मी...'

मतदान संपल्यानंतर कर्मचारी अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असतात. अशावेळी मतदानाचा अंतिम डेटा अपडेट करण्यास वेळ लागला. या प्रक्रियेस निवडणुकीत हेराफेरीच्या दृष्टीकोनातून नाही बघता येणार. विशेष म्हणजे हरियाणामधील निवडणूक निकालानंतर काँग्रेसकडून ईव्हीएमच्या बॅटरी चार्जबाबत प्रश्न उपस्थित केले गेले होते. यावरही निवडणूक आयोगाकडून संपूर्ण सविस्तर उत्तर समोर आले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com