AAP Sarkarnama
देश

BJP Vs AAP in Delhi : 'ईडी,सीबीआय अन् भाजप भाईभाई'; मुबंई,दिल्लीत आप आक्रमक

INDIA Alliance against ED, CBI : संजय सिंह यांच्या अटकेच्या निषेधात इंडिया भाजपविरोधात रान पेटवणार

Sunil Balasaheb Dhumal

Delhi Political News : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली. बुधवारी दहा तासांच्या चौकशीनंतर खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली. या विरोधात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आपने भाजप सरकारविरोधात घेतलेल्या पवित्र्याने मुंबई, दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (Latest Political News)

संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या अटकेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी मुंबई, दिल्लीत आपने भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'ईडी, सीबीआय अन् भाजप भाईभाई', आशा घोषणा देत आपने आक्रमकपणे आंदोलन केले. आपच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी इंडियातील घटक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. परिणामी केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी रान पेटवल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीत ईडीकडून मद्य घोटाळा प्रकरणात संजय सिंह यांच्या निवासस्थानावर मंगळवारी सकाळी छापे टाकण्यात आले होते. तर यापूर्वी संजय सिंह यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले होते. मद्य घोटाळ्याच्या आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव होते. त्यामुळे मंगळवारी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेनंतर आपसह इतर मित्र पत्र आक्रमक झाले आहेत. (Maharashtra Political News)

केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून केल्या जात असलेल्या कारवाईला सर्वच राजकीय पक्ष कंटाळले आहेत. ईडी व सीबीआयला पुढे करीत केंद्र सरकारकडून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे. केंद्राच्या या भूमिकेवर विरोधकांनी वारंवार जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. आता संजय सिंह यांच्या अटकेच्या निषेधार्थ आक्रमकपणे आंदोलन केले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT