Arvind Kejriwal, Swati Maliwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तनावर केजरीवालांची चुप्पी; पीए फिरतोय सोबतच

Swati Maliwal Case : स्वाती मालीवाल यांच्याबाबत केजरीवालांना गुरूवारी पत्रकारांनी प्रश्न विचारले. मात्र, त्यावर केजरीवाल काहीच बोलले नाहीत. खासदार संजय सिंह यांनीही त्यावर बोलणे टाळले.

Rajanand More

Uttar Pradesh News : आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या खासगी सचिवावर दिल्लीचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चुप्पी साधली आहे. हा खासगी सचिव केजरीवालांसोबत सर्वत्र फिरताना दिसत असल्याने आता या प्रकरणाचे गुढ वाढले आहे. तसेच मालीवाल यांच्याकडूनही अद्याप पीएची पोलिसांत अधिकृत तक्रार करण्यात आलेली नाही. दरम्यान, मालीवाल यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप त्यांचे पूर्वाश्रमीच्या पतीने बुधवारी केला होता.

अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव बिभव कुमार (Vibhav Kumar) यांच्याकडून स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले आहे. आपचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनीही याची कबुली दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीत हे प्रकरण चांगलचं तापू लागले आहे.

गुरूवारी केजरीवाल उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात दाखल झाले. यावेळी बिभव कुमार हे केजरीवालांसोबतच होते. विमानतळापासून समाजवादी पक्षाच्या कार्यालयापर्यंत ते सोबत होते. त्यानंतर अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केजरीवालांना मालीवाल आणि बिभव यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. पण त्यावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार संजय सिंह यांनीच पत्रकारांना उत्तरे दिली. आम आदमी पक्ष आमचा परिवार आहे. त्यावर पक्षाने भूमिका स्पष्ट केली आहे, असे म्हणत संजय सिंह यांनी मणिपूर, प्रज्वल रेवण्णा सेस्क स्कॅंडलवर बोलण्यास सुरूवात केली. तसेच भाजप राजकीय खेळ खेळत असल्याची टीकाही त्यांनी केली. तर अखिलेश यांनीही मालीवाल यांच्यापेक्षा इतर महत्वाचे मुद्दे आहेत, त्यावर बोला असे सांगितले.

दरम्यान, भाजपने या प्रकरणावरून जोरदार रान उठवले आहे. आज केजरीवालांनी मालीवाल प्रकरणावर चुप्पी साधल्यानंतर भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, मालीवाल या विरोधी पक्षातील नेत्या असल्या तरी भाप त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहे. तुम्ही एकही शब्द बोलू शकत नसाल, तर राजीनामा द्यायला हवा. देशातील महिला संतापल्या असून अपमानित झाल्या आहेत. त्याला केजरीवाल जबाबदार असल्याची टीका भाटिया यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT