Shyam Rangeela News : मोदींविरुद्ध निवडणूक लढवण्याचं स्वप्न भंगलं; अर्ज फेटाळल्यानंतर श्याम रंगीला भावूक...

Shyam Rangeela election application was rejected : कागदपत्रे, प्रस्ताव इत्यादी सर्व काही होते. डीएमने सांगितले की, तुमच्या कागदपत्रात त्रुटी आहेत. तुम्ही शपथ घेतली नाही."
Shyam Rangeela News
Shyam Rangeela NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Varanasi News : वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या कॉमेडियन श्याम रंगीला यांना मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान निवडणूक आयोगाने श्याम रंगीला यांच्यासह एकूण 32 उमेदवारांचे अर्ज फेटाळले आहेत. आता वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात फक्त सात उमेदवार उरले आहेत. (Latest Marathi News)

यामध्ये काँग्रेस आणि बसपाच्या उमेदवारांचा समावेश आहे. श्याम रंगीला यांचा उमेदवारी अर्ज फेटाळल्यानंतर त्यांचा चांगलाच संताप झालेला दिसला. सोशल मीडिया X अकाऊंटवरुन उमेदवारी अर्ज नाकारण्याचे कारण स्पष्ट करताना, ते म्हणाले की मी शपथ घेतली नसल्याचे डीएमने सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shyam Rangeela News
Pune BJP News : 'सबका हिसाब होगा'; भाजप पदाधिकाऱ्यांच्या कामाचं होणार पोस्टमार्टेम ...
Shyam Rangeela News
Shyam Rangeela : वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार श्याम रंगीला!

उमेदवारी अर्ज फेटाळल्यानंतर श्याम रंगीला म्हणाले, "काल खूप आनंद झाला, लोकशाहीवर विश्वास होता, पण 24 तासात एखाद्या खेळात रोमांच असतो, तसाच प्रकार वाराणसीत घडलं. आयोगाने निवडणुकीचा (Election) खेळच बनवलं आहे. "माझा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. अर्ज स्वीकारायचं नव्हतंच तर असं नाटक का केलं गेलं? कागदपत्रे, प्रस्ताव इत्यादी सर्व काही होते. डीएमने सांगितले की, तुमच्या कागदपत्रात त्रुटी आहेत. तुम्ही शपथ घेतली नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.