AAP split news : देशाच्या राजकारणातील सध्याची सर्वात मोठी घडामोर समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी अखेर बंड केले असून ते पक्षातून बाहेर पडले आहेत. चड्ढा यांनी आपल्यासोबत पक्षाचे इतर सहा खासदारही फोडले असून हा गट भाजपमध्ये विलीन झाला आहे. त्यामुळे हा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
खासदार चड्ढा यांना काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटविले होते. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून चड्ढा आणि आपमधील दुरावा चांगलाच वाढला होता. चड्ढा यांनी उघडपणे पक्षाला आव्हान दिले होते. अखेर आज त्यांनी राज्यसभेतील अन्य सहा सहकाऱ्यांसोबत बंड केले आहे.
चढ्डा यांच्यासह उपनेते अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. या तिघांसह माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम सहानी आणि राजेंद्र गुप्ता या खासदारांनीही आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
चड्ढा यांनी सांगितले की, आम आदमी पक्षाचे राज्यसभेत दहा खासदार आहे. त्यानुसार आम्ही संविधानातील तरतुदीनुसार दोन तृतियांश खासदारांचा एक गट केला आहे. तो गट भाजपमध्ये विलीन केला आहे. तसे पत्र राज्यसभेच्या सभापतींना दिले असून त्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे चड्ढा यांनी स्पष्ट केले.
राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटविल्यानंतर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. आप नेत्यांनी चड्ढा यांना टार्गेट करताना ते आधीपासूनच भाजपच्या बाजूने झुकल्याचे म्हटले होते. राघव चड्ढा राज्यसभेत कधीच केंद्र सरकारवर टीका करत नाही, असा आरोप केला होता. त्यावर चड्ढा यांनी सोशल मीडियातून प्रत्युत्तर दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.