West Bengal election : शहांच्या धक्कादायक दाव्यानंतर ममतादीदींच्या नेत्यानं काही मिनिटांतच वाढविली भाजपची धडधड; मतदानाची चिरफाड, आकडे पाहून तुम्हीही चक्रवाल…

Amit Shah statement Bengal, Mamata Banerjee TMC response : एसआयआरमुळे मतदारसंख्या कमी झाल्याने दोन्ही वर्षातील मतांच्या टक्केवारीत फरक दिसत असल्याचे सांगत डेरेक ओब्रायन यांनी तृणमूल काँग्रेसच्या विजयाचा दावा केला आहे.
Amit Shah, Narendra Modi, Mamata Banerjee
Amit Shah, Narendra Modi, Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

West Bengal voting data analysis : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात छप्परफाड मतदान झाले आहे. बंगालमध्ये मतदानाचे जुने सर्व रेकॉर्ड मोडित निघाले असून तब्बल ९२.८८ टक्के मतदान झाले आहे. मतदारांच्या या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्या टप्प्यातील १५२ जागांपैकी भाजपला ११० जागा मिळतील, असा तृणमूल काँग्रेसला धडकी भरविणारा दावा केला.

अमित शहांच्या या दाव्यानंतर आता तृणमूल काँग्रेसनं मतदानाच्या आकड्यांची चिरफाड करत भाजपचीच धडधड वाढविली आहे. तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन यांनी अमित शहांना उद्देशून सोशल मीडियात एक पोस्ट करत २०२१ आणि २०२६ मधील मतदानाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे.

ओब्रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये पहिल्या टप्प्यात एकूण ३ कोटी ६७ लाख मतदार होते. त्यावर्षी ३ कोटी १० लाख मतदारांनी मतदान केले होते. ही टक्केवारी ८४ एवढी होते. मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणी म्हणजे SIR नंतर २०२६ मध्ये एकूण मतदार ३ कोटी ३३ लाख झाले आहेत.

Amit Shah, Narendra Modi, Mamata Banerjee
Iran response India culture : भारताला 'नरक' म्हणणाऱ्या ट्रम्प यांना इराणने दाखविला 'महाराष्ट्र'; गणेशोत्सव अन् सह्याद्री... आधी बघा मग बोला...

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण मतदारसंख्या ३ कोटी ३३ लाख एवढी होती. यंदा ३ कोटी ९ लाख मतदारांनी मतदान केल्याने मतदान ९२.७० टक्क्यांवर पोहचले. याचाच अर्थ २०२१ आणि २०२६ ची तुलना केल्यास प्रत्यक्ष एकूण मतदानाचा आकडा कमी झाला आहे. केवळ टक्केवारीमध्ये वाढ दिसत असल्याचा दावा ओब्रायन यांनी केला आहे.

२०२१ मध्ये ३ कोटी १० लाख मतदारांनी मतदान केले होते. तर २०२६ मध्ये हा आकडा ३ कोटी ९ लाख असल्याचा दावा करत ओब्रायन यांनी भाजपचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे यंदा मतदारांची संख्या ८३ हजार ६७४ ने कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. २०२१ व २०२६ च्या निडणुकीतील मतदानाचा आकड्यातील फरक अत्यंत कमी आहे.

Amit Shah, Narendra Modi, Mamata Banerjee
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचे थेट मंत्रालयात पडसाद; पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्याला दणका

एसआयआरमुळे मतदारसंख्या कमी झाल्याने दोन्ही वर्षातील मतांच्या टक्केवारीत फरक दिसत असल्याचे सांगत ओब्रायन यांनी तृणमूल काँग्रेसच्या विजयाचा दावा केला आहे. दरम्यान, एसआयआरमध्ये मृत मतदार, पत्ता बदल, दुबार नावे, स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे लाखो मतदार कमी झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com