Arvind Kejriwal FIR Bangla Sahib case Sarkarnama
देश

AAP MLAs Resign : 'आप'च्या दोन आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, अरविंद केजरीवालांना धक्का

Arvind Kejriwal Setback : आम आदमी पक्षाला पंजाब निवडणुकीच्या आधी धक्का बसला आहे. दोन आमदारांनी आपला तडकाफडकी राजीमाना दिला आहे.

Roshan More

AAP News : आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. पंजाब विधानसभेच्या आधी 'आप'ने 40 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये दोन आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे.

पंजाबमधील पाटियालाच्या सानौर मतदारसंघाचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा आणि आमदार, माजी मंत्री चेतन सिंग जौरामाजरा यांनी 'आप' प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांचे पक्षश्रेष्ठींसोबत वाद होते. त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट मिळणार नसल्याची चर्चा होती. त्यातच 40 जणांच्या यादीत नाव न आल्याने त्यांना तडकाफडकी आपला राजीनामा दिला.

त्यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अकाली दलाचे नेते आणि माजी मंत्री सुरजीत सिंह रखडा या आपमध्ये प्रवेश दिला होता. तेव्हापासून हरमीत सिंग पठाणमाजरा हे नाराज होते. त्यातच आपल्या मतदारसंघातील विकासकामांवरून देखील त्यांचे पक्षांच्या नेत्यांसोबत वाद झाले होते.

पंजाबची निवडणूक कधी?

पंजाब विधानसभेची निवडणूक ही पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. आप विरुद्ध काँग्रेस अशी प्रमुख लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, भाजप आणि अकाली दलमध्ये देखील युतीची चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT