Arvind Kejriwal  Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News: AAP नेत्यांच्या अटकेमागील भाजपचे षडयंत्र कार्यकर्ते जनतेसमोर मांडणार; सोमवारपासून...

AAP News: प्रत्येक वार्डात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Delhi News: दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी सीबीआयने आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया गेल्या महिन्यात 8 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक केली होती. सिसोदिया यांना त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या एक दिवस आधी काल (गुरुवारी)अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आहे.

सत्ताधारी भाजपने आपच्या नेत्यांना केलेल्या अटकेच्या विरोधात आता आम आदमी पक्ष १३ मार्चपासून दिल्लीत एक मोहिम राबविणार आहे. दिल्लीच्या प्रत्येक वार्डात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत.

"आम आदमी पक्षाच्या नेत्यांना भाजपचे षडयंत्र करुन केलेल्या अटकेबाबत हे कार्यकर्ते नागरिकांना माहिती देणार आहेत. यासाठी पक्षाने जोरदार तयार केली आहे. दिल्लीतील २५० वार्डात कार्यकर्त्यांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे प्रदेश संयोजक, मंत्री गोपाल राय यांनी सांगितले.

माजी मंत्री मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्या अटकेबाबत जनतेला माहिती देणार आहेत. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सह्यांची मोहिम राबविण्यात येणार आहे. मोदींना पत्र पाठवून जनता आपला राग वक्त करणार आहे. या मोहिमेसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आमदार व नगरसेवकांसोबत नुकतीच बैठक घेतली आहे.

दिल्ली लिकर पॉलिसी केसप्रकरणी ईडीला कोर्टाकडून तीन दिवसांच्या चौकशीची परवानगी मिळाली आहे. काल ईडीने कारागृहात चौकशीसाठी तुरुंग प्रशासनाशी संपर्क साधला होता.मंगळवारीही ईडीने तुरुंगात सिसोदिया यांची चौकशी केली होती. काल त्यांना अटक करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT