Maharashtra Budget : महिलांना बस प्रवासात 50 टक्के सूट देण्याची घोषणा ही दिल्ली मॉडेलची कॉपी; 'आप'ची टीका

AAP : राज्य अर्थसंकल्पावर 'आप'ची टीका, तर भाजपकडून स्तुतीसुमने
Maharashtra Budget
Maharashtra Budget Sarkarnama

पिंपरी : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केला. तो राज्याला बलशाली बनवणारा असल्याची स्तुतीसुमने भाजपने उधळली आहेत. तर, तो मोठ्या घोषणांचा अवकाळी पाऊस असल्याची टीका आम आदमी पार्टीने केली आहे.

सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून सादर केलेला हा अर्थसंकल्प राज्याला प्रगतीपथावर नेणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

त्यात पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारासह बालेवाडी येथे स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारणीचीही घोषणा असल्याने शहराच्या क्रीडा क्षेत्रालाही चालना देण्याचा संकल्प झाला आहे, असे क्रीडाप्रेमी पैलवान आ.लांडगे म्हणाले.

Maharashtra Budget
Maharashtra Budget: शिवसृष्टीत साकारणार राजसभा अन् पुरंदरचा तह; अर्थसंकल्पात ५० कोटीची तरतूद

पर्यटन विकास, पायाभूत सोयी-सुविधा, आरोग्य, शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन, विद्यार्थ्यांसाठी विविध महत्त्वाकांखी योजना आणि विशेष म्हणजे महामानवांच्या स्मारकांसाठी निधीची तरतूद त्यात केल्याबद्दल पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.

राज्याचा अर्थसंकल्प हा सर्व समाज घटकांना उन्नतीकडे नेणारा, सर्वसमावेशक विकासावर भर देणारा आहे, असे भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले.

समाजातील सर्व घटकांना जे जे हवे ते ते या अर्थसंकल्पातून देण्यात आले आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जनता भागिदार असलेला अर्थसंकल्प मांडला गेला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Maharashtra Budget
Shivneri : शिवनेरी ते वढु बुद्रुक स्वतंत्र महामार्गाची लवकरच घोषणा करू; शिष्ठमंडळाला मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

विकासाची फळे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचतील अशा समृद्ध आणि सर्वसमावेशक महाराष्ट्राची कल्पना त्यात आहे. शेतकरी, महिला, आदिवासी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, वारकरी, असंघटित कामगार, रुग्ण, इतर मागासवर्गीय, गुंतवणूक, रोजगार, पर्यावरणपूरक विकास, शहरांचा सर्वांगिण विकास, गडकिल्ले तसेच पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद आणि सर्वसमावेशक नव्या योजना सुरू करण्याची घोषणा त्यात केली आहे, असे जगताप म्हणाले.

मोठ-मोठ्या घोषणांचा अवकाळी पाऊस

आज सादर झालेला राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे मोठ-मोठ्या घोषणांचा अवकाळी पाऊस आहे, अशी प्रतिक्रिया आपचे पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी दिली.

अवकाळी पाऊसाचा फायदा कमी आणि तोटाच अधिक असतो, असे सांगत या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि घोषणांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Maharashtra Budget
Maharashtra Budget : शिक्षण सेवकांसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ; बस तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी कुठल्या प्रकारची तरतूद त्यात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या संकल्पनेतून दिल्ली आणि पंजाबमध्ये सुरु केलेल्या मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर आपला दवाखाना महाराष्ट्रात सुरु करण्याची आणि महिलांना बस प्रवासात 50 टक्के सूट देण्याची घोषणा ही दिल्ली मॉडेलची कॉपी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com