Bhagwant Maan, Arvind Kejriwal
Bhagwant Maan, Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : केजरीवाल आता मध्य प्रदेशातही; कुणाचे गणित बिघडवणार?

सरकारनामा ब्यूरो

Madhya Pradesh : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे आता मध्य प्रदेशच्या मैदानात उतरले आहेत. याआधी ते दिल्ली, पंजाब, गुजरात या राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी ते मैदानात उतरले होते. त्यामध्ये त्यांना दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन करण्यास यश आलं.

गुजरातमध्ये मात्र, त्यांना जास्त यश मिळालं नाही. यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा मध्य प्रदेशकडे वळवला आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष विशेष तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आम आदमी पार्टी (आप) येत्या 14 मार्चपासून मध्य प्रदेशात जोरदार तयारीसह आपला प्रचार सुरू करणार आहे. या पार्श्वभूमीवरच भोपाळमध्ये राज्यस्तरीय कामगार परिषद आणि सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे उपस्थित राहणार आहेत. मध्य प्रदेश विधानसभेच्या सर्व जांगावर आम आदमी पार्टी आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य प्रदेश आम आदमी पार्टी कोणत्या राजकीय पक्षाचे गणित बिघडवणार? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही चर्चांना उधाण आलं होतं. आता केजरीवालांनी आपला मोर्चा मध्य प्रदेशकडे वळवल्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT