Ambadas Danve News: गद्दार, पन्नास खोक्यांची होळी केल्याने दानवे-म्हस्केंमध्ये जुंपली..

Shivsena : खोके जाळले म्हणून आग होत असेल तर होळीनिमित्त पाठवलेली 'बरनॉल' ची भेट स्वीकारावी.
Ambadas Danve-Mhaske News
Ambadas Danve-Mhaske NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी काल छत्रपती संभाजीनगरात होलिकोत्सव साजरा केला. होळी दहन करतांना त्यांनी शिंदे गटातील आमदारांचा गद्दार आणि पन्नास खोके असा उल्लेख करत चक्क खोक्यांचीच होळी केली. याचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसिद्ध होताच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दानवे यांच्याव निशाणा साधला.

Ambadas Danve-Mhaske News
Chhatrapati Sambhajinagar News : नामांतरावरून राजकारण पेटले, शिरसाट-इम्तियाज भिडले...

` अरे अंबादास दानवे आपण काय करतोयं याचं भान ठेवशील का? कोणामुळे निवडून आलो आठवतंय का काही? शिंदे साहेब होते मैदानात बाकी कोणी नाही, असे ट्विट करत डिवचले. (Shivsena) यावर अंबादास दानवे यांनी पलटवार करणारे ट्विट करत नरेश म्हस्के यांनाही काही प्रश्न उपस्थितीत केले. (Eknath Shinde)

दानवे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, नरेश म्हस्के, स्वस्तातले आठवले म्हणून तुमचे बारसे केले आहे शिवसैनिकांनी. शिंदेंचा विरोध असताना तुम्हाला उद्धव साहेबांनी ठाण्याचा महापौर केलं होतं. चांगलं लक्षात कशाला ठेवाल तुम्ही, ना! निष्ठा आणि मिंधे गट हे परस्परविरोधो शब्द आहेत.

शिंदेंचा एबी फॉर्म देखील 'मातोश्री' वरून यायचा, याची भूल पडली तुम्हाला. खोके जाळले म्हणून आग होत असेल तर होळीनिमित्त पाठवलेली 'बरनॉल' ची भेट स्वीकारावी. लावा आणि भाजपची पालखी उचलायला जा सकाळ झाली की, असा टोला लगावला आहे.

पन्नास खोके, एकदम ओके, गद्दार असा उल्लेख ठाकरे गटाकडून वारंवार केला जातो. यावरून वाद देखील झाल्याचे पहायला मिळाले होते. आता होळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा यावरून वाद होतांना दिसतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com