MCD Election Result  Sarkarnama
देश

MCD Election Result : 'आप'चा सर्वात चर्चित उमेदवार बॉबी किन्नरने निवडणुकीचं मैदान मारलं!

MCD Election Result : अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर काही काळाने राजकारणात प्रवेश.

Chetan Zadpe

MCD Election Result : दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीत आम आदमी पक्षाने एकहाती सत्ता मिळवली. आपने २५० पैकी १३४ जागा जिंकल्या, तर भाजपला १०४ जागा जिंकता आल्या, तर काँग्रेसनला फक्त ९ जागांवरच समाधान मानावे लागले.या निवडणुकीत विशेष म्हणजे आप पक्षाचे सर्वात प्रसिद्ध उमेदवार बॉबी किन्नर यांनी देखील एमसीडी निवडणुकीत विजय मिळवला आहे.

सुलतानपुरी वॉर्डातून निवडणूक लढवणारे आपचे उमेदवार बॉबी किन्नर गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेत सक्रिय आहेत. अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर काही काळाने बॉबी किन्नर राजकारणात आले. बॉबी किन्नर या आम आदमी पार्टी मध्ये सामील झाले.

बॉबी किन्नरने महिला आणि दिव्यांगांना साहाय्य केले आहे. एकटे उभे राहून त्यांनी त्यांच्या प्रभागातील उद्यानाची स्वच्छता करून घेतली होती. "आतापर्यंत मी कोणतीही जबाबदारी न घेता इतकी कामे केली आहेत, त्यामुळे नगरसेवक झाल्यानंतर साहजिकच माझ्याकडून खूप कामे होतील. आम आदमी पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट दिले, यासाठी मी अरविंद केजरीवाल यांचा खूप आभारी आहे, असा बॉबी म्हणाला.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बॉबी किन्नर म्हणाले होते की, जनताच मला विजयी करतील. परिसराची स्वच्छता हे माझे प्राधान्य असेल. माझ्या समाजातील इतर लोकांनीही चांगले काम करावे, अशी माझी इच्छा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT