CJP Abhijeet Dipke Sarkarnama
देश

CJP News: जामीन मंजूर होताच अभिजीत दिपके पुन्हा मैदानात, नवं ट्विट; दास-रांका यांचा फोटो अन् 'ती' कॅप्शन, 'सीजेपी'ची लवकरच मोठी घोषणा..?

CJP Protest : दिल्ली पोलिसांनी अलर्ट राहून सीजेपीचे दोन लागोपाठचे आंदोलनं गुंडाळण्यात काही प्रमाणात यश मिळवलं आहे. दिपके जरी जामिनावर सुटले असले,तरी अद्याप सौरव दास आणि रांका हे दोन नेते अजून न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे सीजेपीचं आंदोलन येत्या काही दिवसांत नेमक्या कोणत्या दिशेनं पुढं जाणार याचा सध्यातरी अंदाज बांधणं कठीण आहे. मात्र, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या सुटकेनंतर सीजेपीच्या माध्यमातून दिपके नवा लढा उभारू शकतात,

Deepak Kulkarni

New Delhi News: देशाची राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या पुन्हा एकदा जंतर मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.16) सीजेपीच्या वतीनं दिल्लीमध्ये लहरा दो तिरंगा रॅली काढण्यात येणार होती. त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली. आता अटी-शर्तींसह दिल्ली कोर्टानं जामीन मंजूर करताच अभिजीत दिपकेंनी एक ट्विट केलं आहे.

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची शनिवारी(ता.17 ऑक्टोबर) जामिनावर सुटका होताच सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवर एक पोस्ट शेअर केलं आहे. या ट्विटमुळे कॉक्रोच जनता पार्टी लवकरच ज्ञानेश कुमार, एसआयआर प्रक्रिया, निवडणूक आयोग आणि सरकारविरोधात पुन्हा एकदा नवा काय धमाका करणार याबाबतच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

अभिजीत दिपके यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये सौरव दास आणि आशुतोष रांका या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला त्यांनी आता मी माझ्या या दोन भावाच्या सुटकेची वाट पाहत आहे, अशी कॅप्शनही दिली आहे. अभिजीत दिपके यांना काही अटी शर्तींसह जामीन मंजूर झाल्यानंतर हे ट्विट केल्यामुळे त्याबाबक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

दिल्ली पोलिसांनी अलर्ट राहून सीजेपीचे दोन लागोपाठचे आंदोलनं गुंडाळण्यात काही प्रमाणात यश मिळवलं आहे. दिपके जरी जामिनावर सुटले असले,तरी अद्याप सौरव दास आणि रांका हे दोन नेते अजून न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे सीजेपीचं आंदोलन येत्या काही दिवसांत नेमक्या कोणत्या दिशेनं पुढं जाणार याचा सध्यातरी अंदाज बांधणं कठीण आहे. मात्र, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या सुटकेनंतर सीजेपीच्या माध्यमातून दिपके नवा लढा उभारू शकतात,

तसेच अभिजीत दिपके यांनी केलेल्या ट्विटमधून सीजेपीच्या नव्या धमाक्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिपके हे सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेनंतर कॉकरोच जनता पार्टीसह नव्या आंदोलनाची घोषणा करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीकरिता जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांकडून या परिसरात जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यानंतरही सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका हे दोघेजण आपल्या काही मित्रांसोबत जंतर मंतरवर दाखल झाले होते. त्यांच्या याच कृतीमुळे पोलिसांनी रांका आणि दास यांना ताब्यात घेतलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT