Mahayuti Government News: सचिन अहिर अन् बनसोडेंना मोठा धक्का; उपसभापती-उपाध्यक्षांचा महत्त्वाचा अधिकार काढला, नार्वेकर-शिंदेंची वाढली 'पॉवर'

Sachin Ahir And Anna Bansode News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काही महिन्यांपूर्वीच 'जय महाराष्ट्र' करत आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर त्यांना विधान परिषदेचं उपसभापतीपद देत शिंदेंनी त्यांना मोठं गिफ्टही दिलं होतं. अहिरांसह विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडे यांनाही मोठा धक्का बसला आहे.
Anna Bansode Sachin Ahir News
Sarkarnama Anna Bansode Sachin Ahir News
Published on: 
Updated on: 

Mumbai News: राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांच्या धर्तीवर राजकीय रणधुमाळी सुरू आहेत. राजकीय घडामोडी, आरोप-प्रत्यारोप-माघार बंडखोरी यांनी निवडणूक जवळ येत असतानाच रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. याचदरम्यान,महायुती आणि महाविकास आघाडीतही अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत. आता पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये तीव्र संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर त्यांना विधान परिषदेचं उपसभापतीपद देत शिंदेंनी त्यांना मोठं गिफ्टही दिलं होतं. अहिरांसह विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडे यांनाही मोठा धक्का बसला आहे.

विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहातील पीठासीन अधिकाऱ्यांमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. विधिमंडळ इमारतीमध्ये येणाऱ्या अभ्यागतांच्या प्रवेशाबाबत गेल्या सप्टेंबर महिन्यात एक नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीमुळे पीठासीन अधिकाऱ्यांमध्ये प्रशासकीय पातळीवर नवा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

विधानपरिषदेचे उपसभापती आणि विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात त्यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्ते, अधिकारी किंवा अभ्यागतांना स्वतःच्या अधिकारात प्रवेश पास देण्याची परवानगी होती. या त्यांच्या अधिकारांवर काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत.

Anna Bansode Sachin Ahir News
Election Commission: ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात 'इलेक्शन कमिशन'मध्ये मोठी उलथापालथ; 20 महिन्यांमध्ये मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसह 18 ते 20 बदल्या

मात्र,आता नव्या नियमांनुसार,आता या दोघांच्याही कार्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांसाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या कार्यालयातील सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे अहिर आणि बनसोडे यांच्या कार्यालयांचे प्रशासकीय महत्त्व कमी झाले आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात आठवड्यातील सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस सोडले तर दररोज सरासरी दोन मोठ्या प्रशासकीय बैठका पार पडत होत्या. या बैठकांमुळे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा विधिमंडळात मोठ्या संख्येनं राबता होत. तसेच हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त राहत होते. या गोष्टींवर प्रशासनाकडून आक्षेप घेण्यात आला होता.

Anna Bansode Sachin Ahir News
Maharashtra Government Decision : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांचे 1 दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी

मात्र, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नव्या नियमावलीवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी विधिमंडळाच्या चारही सचिवांना बोलावत नव्या नियमावलीवरुन त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली आहे.

उपसभापती सचिन अहिर हे मुंबईतील वरळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने आणि माजी मंत्री असल्याने मुंबई व परिसरातून त्यांचे कार्यकर्ते व तक्रारदार मोठ्या संख्येने विधिमंडळातील त्यांच्या दालनात गर्दी करत असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यांच्या कार्यालयातील वाढत्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

तर दुसरीकडे विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी विधिमंडळातील या नव्या नियमावलीनंतर मंत्रालयासमोरील शिवसेना भवनातून लोकांच्या भेटीगाठीस सुरुवात केली आहे. तसेच यानंतर अहिर हे त्यांच्या 'पुरंदर'बंगल्याचं नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याचठिकाणी त्यांच्या अखत्यारीतील प्रशासकीय बैठका घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com