BJP claims Abhijeet Dipke will contest on Bhim Army ticket Sarkarnama
देश

BJP On Abhijeet Dipke : 'अभिजित दीपके भविष्यात भीम आर्मीच्या तिकिटावर निवडणूक लढवतील'; निशिकांत दुबे यांचा दावा

Nishikant Dubey predicts Abhijeet Dipke may contest on Bhim Army ticket : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अभिजित दीपके भविष्यात भीम आर्मीच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात, असा दावा केला.

Pradeep Pendhare

Political Future of Abhijeet Dipke : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अभिजित दीपके यांच्या राजकीय भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. प्रत्येक जनआंदोलनातून नवे राजकीय नेते निर्माण होत असतात आणि त्याच धर्तीवर झुरळ जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके भविष्यात भीम आर्मीच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात, असे त्यांनी मंगळवारी सांगितले.

संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना भाजप (BJP) खासदार दुबे यांनी विविध जनआंदोलनांचा संदर्भ देत आपले मत व्यक्त केले. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक नेते पुढे आले, तर अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांचा उदय झाला, असे त्यांनी नमूद केले. नेपाळमधील 'जनरेशन झेड' आंदोलनाचाही उल्लेख करत, त्या आंदोलनातील कार्यकर्ते पुढे राजकारणात सक्रिय झाल्याचे उदाहरण त्यांनी दिले.

अभिजित दीपके यांच्याभोवती घोषणाबाजी करणारे काही जण भीम आर्मीचे समर्थक असल्याचा दावा करत दुबे म्हणाले की, भविष्यात दीपके एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करतील आणि भीम आर्मीच्या तिकिटावर निवडणूक (Election) लढवतील, असा त्यांचा अंदाज आहे.

निशिकांत दुबे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीत तरुणांच्या प्रश्नांवर भाष्य केले. आंदोलनाशी संबंधित तरुणांनी पारदर्शक चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केल्याचे सांगत त्यांनी, "तरुणांचा विश्वास अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे," असा दावा केला.

केजरीवाल अन् राहुल गांधींवरही टीका

अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दुबे म्हणाले की, अशा प्रत्येक विधानावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पंजाबमधील अंमली पदार्थांच्या प्रश्नावरूनही केजरीवाल यांच्यावर टीका केली. तसेच, लोकपाल आंदोलनानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली का आणि दिल्लीत लोकपाल नियुक्त झाला का, असे प्रश्नही उपस्थित केले.

आणीबाणीचा मुद्दा उकरून काढला

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईबाबत पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी राहुल गांधी यांनी केलेली मागणी फेटाळताना दुबे यांनी काँग्रेसने 1975च्या आणीबाणीसह त्यांच्या सत्ताकाळातील घटनांबद्दल माफी मागावी, अशी भूमिका मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT