RSS Meeting : आरएसएसच्या बैठकीवर काँग्रेसच्या हरिप्रसादांचे वादग्रस्त वक्तव्य; कलबुर्गी अन् लंकेश यांच्या हत्येचा दिला संदर्भ, आता काय घडणार? अशी टिप्पणी

Congress BK Hariprasad targets RSS, seeks CBI probe into alleged Ram Mandir irregularities : कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी बेळगाव येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीवर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
RSS Meeting
RSS MeetingSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Congress : कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (KPCC)चे अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी बेळगाव येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीवर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

आरएसएसची बैठक बेळगावमध्येच का आयोजित करण्यात आली, याची माहिती नसल्याचे सांगताना, अशा बैठकीनंतर काही ना काही अनर्थ घडल्याची उदाहरणे असल्याचा दावा त्यांनी केला. साहित्यिक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांचा उल्लेख करत, 'या बैठकीनंतर काय घडते, हे पाहावे लागेल,' असे ते म्हणाले.

बंगळूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हरिप्रसाद यांनी अयोध्या राममंदिराशी (Ram Mandir) संबंधित कथित दानपेटी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून भाजप आणि आरएसएसवरही टीका केली.

दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनीही अलीकडेच आरएसएसच्या (RSS) नोंदणीचा मुद्दा उपस्थित केला होता. संघाने अधिकृत नोंदणीची कागदपत्रे सादर करावीत, असे आव्हान त्यांनी दिले होते. तसेच आवश्यक नोंदणी नसल्यास राज्यात आरएसएसच्या मिरवणुकांना परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

RSS Meeting
Mukesh Ambani 900 Crore Donation : राम मंदिर देणगीवरून नवा वाद; अंबानींच्या 900 कोटींचा हिशेब कुठे? काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

हरिप्रसाद यांनी अयोध्या राममंदिराशी संबंधित कथित प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. राममंदिर ट्रस्टची स्थापना, भूमिपूजन आणि प्राणप्रतिष्ठा या प्रक्रियेशी पंतप्रधान संबंधित असल्याने या प्रकरणाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारावी, असे ते म्हणाले.

RSS Meeting
Digvijaya Singh On Ram Mandir Scam : राम मंदिर देणगी घोटाळ्यात काँग्रेस आक्रमक; दिग्विजय सिंह यांची ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या अटकेची मागणी

200 कोटींच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

राममंदिराशी संबंधित सुमारे 200 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची तसेच मौल्यवान रामायण ग्रंथ चोरीच्या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही बी. के. हरिप्रसाद यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com