मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली आहे. CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांना राजीनामा देण्यासाठी दिलेली मुदत संपत आली असून, आता आंदोलनाची तारीखही जाहीर केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास 2 ऑक्टोबर, म्हणजेच गांधी जयंतीपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा दीपके यांनी केली आहे.
दीपके यांनी शुक्रवारी सोशल मीडिया X वर पोस्ट करत आंदोलनाबाबत माहिती दिली. “जर ज्ञानेश कुमार यांनी उद्यापर्यंत राजीनामा दिला नाही, तर CJP 2 ऑक्टोबरला मुंबईतून देशव्यापी विरोध प्रदर्शन सुरू करेल. हे आंदोलन भारतातील विविध शहरांमध्ये नेले जाईल. या गांधी जयंतीला लोकशाही वाचवण्याचा संकल्प करूया,” असं त्यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी 24 सप्टेंबर रोजी अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषद घेत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. CJPने त्यांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा त्यावेळी देण्यात आला होता.
CJPने या प्रकरणात 3 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्याविरोधात कारवाई सुरू करावी, Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि जानेवारी 2025 मधील मतदार यादी पूर्ववत करावी, अशी CJPची मागणी आहे. तसेच 2023 मधील निवडणूकविषयक कायद्यात बदल करून निवडणूक आयोगात सुधारणा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मतदार यादीच्या Special Intensive Revision अर्थात SIR प्रक्रियेवरून सध्या राजकीय आणि सार्वजनिक चर्चेला वेग आला आहे. निवडणूक आयोगातील काही मुद्द्यांवर आयुक्तांनी आक्षेप घेतल्याच्या वृत्तानंतर CJPने ज्ञानेश कुमार यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने आयुक्तांमधील मतभेद असल्याच्या दाव्याला नकार देत अंतर्गत चर्चा आणि वेगवेगळी मतं ही आयोगाच्या कामकाजाचा सामान्य भाग असल्याचं स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.