Raj Thackeray on Gyanesh Kumar : 'सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायंत!' राज ठाकरेंचा घणाघात, ज्ञानेश कुमारांसह सरकारवर ओढले आसूड

Raj Thackeray on Gyanesh Kumar controversy : राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि ज्ञानेश कुमारांवर जोरदार टीका केली. ‘सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायंत’ या वक्तव्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
Raj Thackeray on Amit Shah visit
Raj Thackeraysarkarnama
Published on: 
Updated on: 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी काही निर्णयांवर आक्षेप नोंदवल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

राज ठाकरे यांनी ज्ञानेश्वरांच्या कथेशी तुलना करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायत,” असा टोला त्यांनी लगावला. गेल्या 2 दिवसांपासून ज्ञानेश कुमार शांत असल्याचे सांगत, त्यांना बोलते करणारेही कुठे दिसत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray on Amit Shah visit
Sunetra Pawar : "सरकार लवकरच मदत करणार!" सुनेत्रा पवारांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीबाबत दिली महत्त्वाची अपडेट!

ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या व्यक्तींना हाताशी धरून आपण सत्तेचा अमरपट्टा कसा मिळवला, हे भारतीय जनता पक्ष सांगत असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाचा कारभार, SIR प्रक्रिया आणि EVMचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Raj Thackeray on Amit Shah visit
CEC Gyanesh Kumar news : ज्ञानेश कुमार यांचा पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातील महत्वाचा कार्यक्रम रद्द; वाद सुरू असतानाच काय घडलं?

SIR प्रक्रिया रद्द करण्याची राज ठाकरेंची मागणी

राज ठाकरे यांनी 2025 पासून सुरू असलेल्या Special Intensive Revision म्हणजेच SIR प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. SIRच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर चर्चा सुरू आहे.

SIR प्रक्रियेत नेमके काय घोळ झाले, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. सध्याची SIR प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

EVMऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका?

राज ठाकरे यांनी यापुढील सर्व निवडणुका EVMवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासाचा मुद्दा उपस्थित करत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारावे, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या वृत्तानंतर त्यांची ही भूमिका समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com